मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Work From Home लवकरच संपणार! काय आहे TCS, Wipro आणि Infosys चा प्लॅन?

Work From Home लवकरच संपणार! काय आहे TCS, Wipro आणि Infosys चा प्लॅन?

देशभरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात घरातून काम करता यावे याकरता घरातून काम करण्याची अर्थात Work From Home ची परवानगी दिली होती. मात्र आता लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कामासाठी ऑफिसमध्ये रूजू व्हावं लागणार आहे

देशभरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात घरातून काम करता यावे याकरता घरातून काम करण्याची अर्थात Work From Home ची परवानगी दिली होती. मात्र आता लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कामासाठी ऑफिसमध्ये रूजू व्हावं लागणार आहे

देशभरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात घरातून काम करता यावे याकरता घरातून काम करण्याची अर्थात Work From Home ची परवानगी दिली होती. मात्र आता लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कामासाठी ऑफिसमध्ये रूजू व्हावं लागणार आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर: देशभरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात घरातून काम करता यावे याकरता घरातून काम करण्याची अर्थात Work From Home ची परवानगी दिली होती. दरम्यान आता कोरोनाची आकडेवारी कमी होऊ लागली आहे. शिवाय कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे साधारण मार्च 2020 पासून सुरू झालेल वर्क फ्रॉम होम हळूहळू कंपन्या आता बंद करत आहेत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामासाठी ऑफिसमध्ये रूजू व्हावे लागत आहे.  कोविड -19 प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत भारताने एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. सर्व आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. घरातून काम करण्याचं कल्चर आता हळूहळू कमी होत आहे. घरातून एका वर्षाहून अधिक काळ काम केल्यानंतर आता TCS, Infosys, HCL Technologies सारख्या देशातील टॉप IT कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना पुन्हा बोलावण्याच्या योजनेचा खुलासा केला आहे.

वाचा-खरेदी करता येईल खिशाला परवडणारं स्वत:चं घर, PNB देत आहे संधी

काय असणार TCS चा प्लॅन?

देशातील सर्वात मोठी आयटी फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS Work From Home) ने सांगितले आहे की ते कर्मचार्‍यांना डेस्कवर म्हणजेच ऑफिसमधून काम करण्यासाठी परत बोलावतील कारण त्यांच्यापैकी जवळपास 70 टक्के जणांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे आणि सुमारे 95 टक्के लोकांना एक लस मिळाली आहे. घेतले. कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर मिलिंद लक्कर म्हणाले की, कंपनी कर्मचाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस कार्यालयात बोलवण्याचा विचार करत आहे. याआधी, टीसीएसने सांगितले होते की वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत, ते 90 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावतील. या दिग्गज आयटी फर्मने कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे.

हायब्रिड मॉडेल वापरणार इन्फोसिस

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिस (Infosys Work From Home) हायब्रिड मॉडेलचा अवलंब करणार आहे. कोरोना साथीच्या काळात लोकप्रिय झालेल्या या हायब्रिड मॉडेलमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणाहून काम करण्याची परवानगी आहे. कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितले की त्यांच्या 86 टक्के कर्मचाऱ्यांना कमीतकमी एक डोस मिळाला आहे आणि आता कंपनी हायब्रिड मॉडेलसह पुढे जाईल.

वाचा-700% चा भरभक्कम रिटर्न! या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले ₹8.39 लाख

विप्रोच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

इन्फोसिस प्रमाणे, मॅरिको (Marico Work From Home) आणि विप्रो (Wipro Work From Home) सारख्या कंपन्या देखील हायब्रीड मॉडेलचा अवलंब करत आहेत, ज्यामुळे कंपन्यांना कर्मचार्‍यांच्या प्रवासाच्या वेळेची बचत करण्याव्यतिरिक्त भाडे आणि वीज खर्च कमी करण्यात मदत होत आहे. विप्रोच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याबाबत माहिती विप्रोचे चेअरमन ऋषद प्रेमजी यांनी दिली आहे. त्यांनी 12 सप्टेंबर रोजी ट्वीट केले होते की, 'आमच्या कंपनीचे कर्मचारी उद्यापासून म्हणजेच 13 सप्टेंबरपासून आठवड्यातून दोनदा कार्यालयात येतील. सर्वांचे पूर्णपणे लसीकरण केले आहे. कंपनीत सामाजिक अंतर आणि सुरक्षा नियमांचे पालन केले जाईल. आम्ही यावरही लक्ष ठेवू.'

आठवड्यातून दोन वेळा ऑफिसमध्ये जातायंत HCL Technologiesचे कर्मचारी

आयटी क्षेत्रातील दिग्गज एचसीएल टेक्नॉलॉजीज अशाच प्रकारे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून दोनदा कार्यालयात (HCL Technologies Work From Home) बोलावत आहे, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना एका दिवशी यावे लागते. या वर्षाच्या अखेरीस या योजनेला गती मिळेल अशी कंपनीला आशा आहे.

First published:

Tags: Corona, Corona updates, Lockdown, Work from home