नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर: सणासुदीच्या काळात मोठी खरेदी करण्याची परंपरा आजही अनेकजण जपून आहेत. या काळात शुभ म्हणून अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. दरम्यान काही जणं घरखरेदीला देखील पसंती देतात. कारण या सणासुदीच्या काळात गृहकर्जावर विविध बँका ऑफर्सही देतात. तुम्ही या काळात घरखरेदीचा विचार करत असाल तर देशातील महत्त्वाची सरकारी बँक असणारी पंजाब नॅशनल बँक तुम्हाला ही संधी देत आहे. तुम्हाला बाजार भावापेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करता येईल. देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या पीएनबीने (PNB) खास ऑफर आणली आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank Property Mega E-auction) प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. यामध्ये तुम्ही स्वस्तात घरखरेदी (Buy Residential Property) करू शकता. 28 ऑक्टोबर रोजी बँकेकडून ई-लिलाव (PNB Mega E-auction Date) केला जाणार आहे.यात गुंतवणुकदारांना रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, अॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. वाचा- दिवाळी शॉपिंग करतानाच व्हाल मालामाल! 1 लाख रुपये जिंकण्याची संधी केव्हा होणार लिलाव? पीएनबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली आहे. ट्वीटवर बँकेने असे म्हटले आहे की, मेगा ई-लिलाव 28 ऑक्टोबर, 2021 रोजी होईल. यात निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा लिलाव होईल. तुम्ही याठिकाणी वाजवी किंमतींत मालमत्ता खरेदी करू शकता.
Have you been eyeing a property for long?
— Punjab National Bank (@pnbindia) October 23, 2021
Mega e Auction offers just the right opportunity to place your bid for residential & commercial property. Visit e-Bikray Portal at https://t.co/N1l10s1hyq to know more. pic.twitter.com/Yujid1dyvC
करावं लागेल रजिस्ट्रेशन e-Bkray पोर्टल https://ibapi.in/ वर तुम्हाला याकरता नोंदणी करावी लागेल. याठिकाणी जाऊन ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर जाऊन ही नोंदणी करता येईल. बिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. KYC डॉक्युमेंटची आवश्यकता त्यानंतर बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो. वाचा- 700% चा भरभक्कम रिटर्न! या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले ₹8.39 लाख बँकेकडून विविध वेळी केला जातो लिलाव ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात. प्रॉपर्टी लिलावाबाबत अधिक माहितीसाठी https://ibapi.in/ या लिंकवर माहिती घेऊ शकता. E-Auction द्वारे प्रापर्टी खरेदी करायची असेल, तर बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत माहिती घेता येईल.