मराठी बातम्या /बातम्या /मनी /

700% चा भरभक्कम रिटर्न! 5 रुपयांचा हा स्टॉक पोहोचला ₹42 वर, 6 महिन्यात गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले ₹8.39 लाख

700% चा भरभक्कम रिटर्न! 5 रुपयांचा हा स्टॉक पोहोचला ₹42 वर, 6 महिन्यात गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले ₹8.39 लाख

 या पेनी शेअरने (Penny stocks)देखील गुंतवणूकदारांना अतिशय कमी वेळात मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger stocks Return) दिला आहे. हा स्टॉक म्हणजे रतनइंडिया (Rattanindia Enterprises stock) एंटरप्रायजेस या कंपनीचा.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली,  23 ऑक्टोबर: शेअर मार्केटमध्ये गेल्या काही काळापासून गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. सामान्य माणसही शेअर मार्केटकडे एक कमाईचं साधन (share market Earning money) म्हणून बघत आहेत. दरम्यान या पेनी शेअरने (Penny stocks) देखील गुंतवणूकदारांना अतिशय कमी वेळात मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger stocks Return) दिला आहे. हा स्टॉक म्हणजे रतनइंडिया (Rattanindia Enterprises stock) एंटरप्रायजेस या कंपनीचा.  Rattanindia Enterprises चा स्टॉक सध्या वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळत आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) मध्येच हा स्टॉक आतापर्यंत (Rattanindia Enterprises stock Price) 700 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. 31 मार्च 2021 रोजी ₹5.1 वर असणारा हा शेअर आज ₹42.8 पर्यंत पोहोचला आहे. अर्थात या कालावधीत  त्यात 739 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत निफ्टी FY22 YTD चा बेंचमार्क निर्देशांक सुमारे 24 टक्क्यांनी वाढला आहे. 31 मार्च 2021 रोजी एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये ₹1 लाखाची गुंतवणूक केवी असेल तर ती आज ₹8.39 लाख झाली असती. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 590 टक्के आणि कॅलेंडर वर्ष 2021 मध्ये आतापर्यंत 529 टक्के वाढ झाली आहे. 27 जुलै 2021 रोजी स्टॉकने ₹70.65 चा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता.

वाचा-100 GW सौरऊर्जेसाठी Reliance ची जगातील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी

जाणून घ्या कंपनीविषयी...

पूर्वी RatanIndia इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ओळखली जाणारी ही फर्म थर्मल पॉवर निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्यात गुंतलेली आहे. अलीकडेच कंपनीने इलेक्ट्रिक वाहने आणि ड्रोन व्यवसायातही प्रवेश केला आहे. FY22 मध्ये कंपनीच्या स्टॉकने आतापर्यंत आपल्या स्पर्धकाना मागे टाकले आहे. वित्तीय वर्ष 22 मध्ये 320 टक्क्यांहून अधिक वाढीसह इतर स्पर्धकांमध्ये JSW एनर्जीचा सर्वाधिक फायदा झाला. दरम्यान, अदानी ट्रान्समिशन 97 टक्के, एनटीपीसी 39 टक्के आणि पॉवरग्रिड 20 टक्क्यांनी वाढली आहे. फर्मने जून तिमाहीत ₹ 23 लाखांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, वर्षभरापूर्वी  8 लाखांचा नफा होता.

First published:

Tags: Investment, Money, Share market