नवी दिल्ली, 12 डिसेंबर: आजकाल प्रत्येकाकडे दोन किंवा तीन मोबाइल क्रमांक असतात. त्यावेळी अनेकांच्या लक्षात राहत नाही की कोणता क्रमांक आधार कार्ड (Aadhar Card) शी लिंक किंवा रजिस्टर्ड आहे. अशावेळी लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विविध कामांकरता आधार कार्ड महत्त्वाचे आहे. बँकिग किंवा इतर आर्थिक कामे, सरकारी कामे, विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी, शैक्षणिक किंवा नोकरी विषयक कामांसाठी आधार गरजेचे आहे. जर तुम्ही देखील विसरला आहात की तुमचा कोणता मोबाइल क्रमांक आधारमध्ये रजिस्टर्ड आहे, तर टेन्शन घेण्याचं कारण नाही. तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता.
अशाप्रकारे प्राप्त करा तुमच्या आधारमध्ये रजिस्टर्ड असणारा मोबाइल क्रमांक
-सर्वात आधी https://uidai.gov.in/ या वेबासाइटवर जा
-त्यानंतर व्हेरिफाय इमेल किंवा व्हेरिफाय मोबाइल क्रमांक या पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
(हे वाचा-विद्यार्थ्यांसाठी SBI ची खास ऑफर! YONO बरोबर करा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी)
-तुमचा कोणता क्रमांक आधार कार्डशी जोडला गेला आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला याठिकाणी आधार कार्ड क्रमांक दाखल करावा लागेल
-जर तुमचा क्रमांक योग्य असेल, तर तुम्ही आधी रजिस्टर केलेल्या क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
-ओटीपी टाकल्यानंतर तुमचा शोध पूर्ण होईल.
-UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड देखील करू शकता.
आधार कार्डशीसंबंधित हे काम लवकर करा पूर्ण
सरकारच्या आदेशानुसार आधार आणि पॅन लिंक करणे (Pan-Aadhaar link) अनिवार्य आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 31 मार्च 2021 पर्यंत हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल. जर लिंकिंगचं काम 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण झालं नाही तर आयकर कायद्या अंतर्गत काही गंभीर परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.
(हे वाचा-रेल्वेचे खाजगीकरण होऊन प्रवाशांना मिळणाऱ्या या सुविधा बंद होणार?)
आयकर विभागाच्या मते 31 मार्च 2021 नंतर जर तुम्ही निष्क्रिय PAN वापरत असाल तर इनकम टॅक्स कायदा सेक्शन 272B अंतर्गत 10000 रुपये दंड भोगावा लागेल. या नोटिफिकेशनमध्ये आयकर विभागाने असं म्हटलं आहे की, 31 मार्च पर्यंत करधारकांनी जर पॅन आणि आधार कार्ड लिंक नाही केलं तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल.