विद्यार्थ्यांसाठी SBI ची खास ऑफर! YONO बरोबर करा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, मिळेल डिस्काउंट

विद्यार्थ्यांसाठी SBI ची खास ऑफर! YONO बरोबर करा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, मिळेल डिस्काउंट

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI State Bank of India) विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट ऑफर सुरू केली आहे. यामध्ये सरकारी नोकरीसाठी तयारी आणि अन्य कोणत्याही परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खास सुविधा दिली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या SBI ने त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू केली आहे. या ऑफर अंतर्गत SBI विद्यार्थ्यांना काही सेवांवर 20 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. बँकेच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला SBO YONO APP वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. एसबीआयचा हा उपक्रम SBI आणि testbook.com च्या पार्टनरशीप अंतर्गत येतो आहे. testbook.com वर सर्व प्रकारचे ऑनलाइन स्टडी मटेरिअल, टेस्ट सीरिज आणि परीक्षांसाठी आवश्यक अन्य प्रकारचे नोट्स उपलब्ध आहेत.

SBI ने याबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून माहिती दिली आहे. SBI ने असं म्हटलं आहे की, 'परीक्षांसाठी तयार राहा! YONO SBI च्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल.'

SBI टेस्टबुक पासवर 20% डिस्काउंट आणि टेस्टबुक सिलेक्टवर 10% डिस्काउंट मिळत आहे. टेस्टबुक पास एक स्पेशल मेंबरशीप पास आहे, जो यावर उपलब्ध सर्व परीक्षांचा अॅक्सेस देतो. या पासचा वापर करून तुम्ही उपलब्ध परीक्षांंच्या कितीही चाचण्या देऊ शकता. याकरता तुम्हाला काही शूल्क द्यावे लागेल. हे शूल्क आधी 299 रुपये होते. SBI ची ऑफर मिळवण्यासाठी YONO अॅपवरून रजिस्ट्रेशन करून YONO20 कोड टाकावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना ही सवलत मिळेल. याचप्रमाणे फेसबुक सिलेक्टवर 10 टक्के ऑफर उपलब्ध करून घेता येईल.

(हे वाचा-मुलीच्या लग्नात 'हे' राज्य सरकार देणार सोनं, वाचा कुणाला आणि किती होईल फायदा)

टेस्टबुक सेलेक्शनमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सेलिक्शन कमिशन, रेल्वे, बँकिंग, एअर फोर्स, टीचिंग, सिव्हिल सर्व्हिसेज आणि अन्य सर्व सरकारी संस्थांसाठी ऑनलाइन लाइव्ह कोचिंग उपलब्ध आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 12, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या