मराठी बातम्या /बातम्या /मनी /

वयाच्या कोणत्या वर्षी LIC ची पॉलिसी घेणे फायदेशीर? मुलांचं भविष्य असं करा सुरक्षित

वयाच्या कोणत्या वर्षी LIC ची पॉलिसी घेणे फायदेशीर? मुलांचं भविष्य असं करा सुरक्षित

अनेक पालकांना आपल्या मुलांच्या नावावर आर्थिक गुंतवणूक करायची असते. मात्र, ती कधीपासून करता येते? याची माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या (LIC) पॉलिसीमध्ये किती कमी वय असताना गुंतवणूक करता येऊ शकते? आणि अशा कोणत्या योजना आहेत? याविषयी माहिती देणार आहोत.

अनेक पालकांना आपल्या मुलांच्या नावावर आर्थिक गुंतवणूक करायची असते. मात्र, ती कधीपासून करता येते? याची माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या (LIC) पॉलिसीमध्ये किती कमी वय असताना गुंतवणूक करता येऊ शकते? आणि अशा कोणत्या योजना आहेत? याविषयी माहिती देणार आहोत.

अनेक पालकांना आपल्या मुलांच्या नावावर आर्थिक गुंतवणूक करायची असते. मात्र, ती कधीपासून करता येते? याची माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या (LIC) पॉलिसीमध्ये किती कमी वय असताना गुंतवणूक करता येऊ शकते? आणि अशा कोणत्या योजना आहेत? याविषयी माहिती देणार आहोत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 17 नोव्हेंबर : आपल्या आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येकजण आर्थिक नियोजन करत असतो. यासाठी आर्थिक गुंतवणुकीवर जास्त भर असतो. सध्या बाजारात गुतवणुकीचे भरमसाठ पर्याय उपलब्ध आहे. यात बहुसंख्य पॉलिसी आणि स्किममध्ये पैसे गुतवण्याला प्राधान्य देतात. सध्या देशात पैसे गुतवण्यासाठी भारतीय जीवन विमा (Life Insurance Corporation of India) म्हणजेच एलआयसी (LIC) कंपनी सर्वात सुरक्षित मानली जाते. या कंपनीच्या विविध योजना आहेत. पालकांना आपल्या मुलांसाठी आर्थिक गुंतवणूक करण्याची इच्छा असते. मात्र, मुलांचे वय किती असताना गुंतवणूक करता येते? किंवा वयाच्या कोणत्या टप्प्यावर पॉलिसी घेणे फायदेशीर आहे, याची माहिती नसते. याच सदर्भात आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

जर तुम्हाला मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल आणि अशी योजना शोधत असाल, ज्यामुळे तुमचं बाळ मोठं झाल्यावर चांगला परतावा मिळेल. अशा परिस्थितीत एलआयसीची न्यू चिल्ड्रन मनी बॅक योजना (New Children Money Back Scheme) उपयुक्त ठरू शकते. ही योजना तुम्ही मुलाच्या जन्माच्या वेळी घेऊ शकता. हे जास्तीत जास्त 12 वर्षे वयापर्यंत घेतली जाऊ शकते. या पॉलिसीचा परिपक्वता कालावधी 25 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत अल्प बचत करून तुम्ही तुमच्या मुलाला अल्पावधीत लखपती करू शकता.

LIC ची नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना ही मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सर्वोत्तम योजना आहे. कारण जोपर्यंत मुले व्यावसायिक अभ्यासक्रम घेण्यास तयार होतील, तोपर्यंत तुमच्याकडे चांगले पैसे उपलब्ध असतील. यामध्ये किमान विम्याची रक्कम रु 1,00,00 आहे तर कमाल रकमेची मर्यादा नाही.

LIC ची पॉलिसीधारकांसाठी Good News! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार

नवीन मुलांच्या मनी बॅक पॉलिसीचे फायदे Money back policy

या योजनेअंतर्गत LIC मुलाच्या 18 वर्ष, 20 वर्ष आणि 22 वर्षाचे झाल्यानंतर मूळ विम्याच्या रकमेच्या 20-20 टक्के रक्कम देते.

योजनेअंतर्गत उर्वरित 40 टक्के रक्कम पॉलिसीधारकाची 25 वर्षे पूर्ण झाल्यावर दिली जाईल.

यामध्ये बोनसचाही फायदा आहे. पॉलिसी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, विमा रक्कम अधिक निहित साधारण प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस दिला जातो.

पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीनंतर एकूण पूर्ण रक्कमेसह बोनस मिळतो.

या प्लॅन अंतर्गत, जर तुम्ही दररोज फक्त 150 रुपये वाचवले तर तुम्हाला 19 लाखांपर्यंतची रक्कम मिळू शकते. ही गणना रक्कम आणि धोरण नियमांनुसार बदलू शकते.

Budget 2021: LIC चे खाजगीकरण निश्चित, कधी येणार IPO हे अर्थमंत्र्यांनी केलं जाहीर

पॉलिसी कशी घेणार? How to take a policy?

एलआयसीच्या नवीन चिल्ड्रन मनी बॅक पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, अर्जदाराला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथून फॉर्म डाउनलोड करा आणि भरा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही शाखेला भेट देऊन किंवा एजंटद्वारे योजनेत गुंतवणूक करू शकता. अर्जाच्या वेळी मुलाचे आणि पालकाचे आधार कार्ड, पत्ता पुरावा, पासपोर्ट साइटचा फोटो इत्यादी गोष्टी आवश्यक आहे.

LIC Mutual Fund मधून पैसे कमावण्याची संधी, फक्त 15 दिवस सुरू राहणार बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड

नवजीवन पॉलिसी

LIC ने या पॉलिसीला Non-linked Participating Endowment Life Insurance म्हटले आहे. या पॉलिसीचे नाव 'नवजीवन' असे ठेवण्यात आले आहे. या नवीन प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाला सिंगल प्रीमियम पेमेंटची सुविधाही मिळणार आहे. याशिवाय पाच वर्षांपर्यंत प्रीमियम भरता येतो. 90 दिवस ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. तसेच, या योजनेअंतर्गत, 45 वर्षांसाठी जोखीम निश्चित करण्याचा पर्याय असेल.

First published:

Tags: Insurance, LIC, Savings and investments