मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Budget 2021: LIC चे खाजगीकरण निश्चित, कधी येणार IPO हे अर्थमंत्र्यांनी केलं जाहीर

Budget 2021: LIC चे खाजगीकरण निश्चित, कधी येणार IPO हे अर्थमंत्र्यांनी केलं जाहीर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2021 (Budget 2021) मध्ये LIC बाबत अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 30 जानेवारी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2021 (Budget 2021) मध्ये LIC बाबत अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. सीतारामन यांनी सांगितल्यानुसार देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC चा आयपीओ (IPO) यावर्षी बाजारात येईल अशी घोषणा केली. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात खाजगीकरणाबाबत घोषणा करण्यात आली होती.

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) च्या माध्यमातून सरकारने आपली LICमधील भागीदारी विकण्याची घोषणा केली आहे. LIC मधील आपली भागीदारी विकून सरकार फंड जमा करण्याच्या विचारात आहे. बजेट सादर करताना सीतारामन यांनी भारत सरकार निर्गुंतवणुकीकरण करणार असणार्या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी एलआयसीच्या आयपीओबाबत माहिती दिली. आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाबाबतही त्यांनी घोषणा केली.

(हे वाचा-नाशिक निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची मोठी घोषणा; थेट अर्थसंकल्पात तरतूद)

एलआयसी आणि आयडीबीआय मधील निर्गुंतवणुकीमधून सरकार 90 हजार कोटींचा फंड उभा करण्याच्या विचारात आहे. तर इतर काही कंपन्यांबाबत देखील निर्गुंतवणूक करण्याचा विचार सरकार करत आहे. या माध्यमातून सरकार 1.2 लाख कोटी उभे करण्याचा सरकारचा मानस आहे. बीपीसीएल, कंटेनर कॉर्परेशन ऑफ इंडिया, शिपिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया अँड एअर इंडिया या कंपन्यांमध्ये सरकार यावर्षी निर्गुंतवणूक करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही

2021 च्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. टॅक्स स्लॅबमध्ये बदल सुचवण्यात आलेला नाही. अर्थातच करमुक्त उत्पन्नात गेल्या वर्षीपेक्षा फार काही बदल अपेक्षित नाही.

First published:

Tags: Budget 2021