मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LIC Mutual Fund मधून पैसे कमावण्याची संधी, फक्त 15 दिवस सुरू राहणार बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड

LIC Mutual Fund मधून पैसे कमावण्याची संधी, फक्त 15 दिवस सुरू राहणार बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड

एलआयसी म्‍युच्युअल फंड अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (LIC Mutual Fund Asset Management Ltd) मध्ये तुम्हाला एका फंडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

एलआयसी म्‍युच्युअल फंड अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (LIC Mutual Fund Asset Management Ltd) मध्ये तुम्हाला एका फंडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

एलआयसी म्‍युच्युअल फंड अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (LIC Mutual Fund Asset Management Ltd) मध्ये तुम्हाला एका फंडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणाऱ्या लाइफ इंन्शोरन्स कॉरपोरेशन (LIC News Update) कडून ग्राहकांसाठी सर्वसमावेशक विमा योजना आणल्या जातात. दरम्यान तुम्ही LIC च्या आणखी एका कंपनीमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. ही कंपनी LIC ची सहयोगी कंपनी आहे. एलआयसी म्‍युच्युअल फंड अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (LIC Mutual Fund Asset Management Ltd) असं या कंपनीचं नाव असून लवकरच तुम्हाला एका फंडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. एलआयसी म्‍युच्युअल फंड अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडने बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार हा एक ओपन एंडेड डायनॅमिक अॅसेट अलॉकेशन फंड असणार आहे. यामध्ये इक्विटी (Equity), डेट (Debt) आणि मनी मार्केट (Money Market) इन्स्ट्रुमेंट्समध्ये मूल्यमापन आणि कमाईसारख्या मापदंडांद्वारे गुंतवणूक करता येईल. सब्सक्रिप्शनसाठी ही नवीन फंड ऑफर (NFO) 20 ऑक्टोबर रोजी उघडेल आणि 3 नोव्हेंबर रोजी बंद होईल.

हे वाचा-Petrol-Diesel Price today:दसऱ्याच्या मूहुर्तावर आज पुन्हा भडकले पेट्रोल-डिझेल दर

गेल्या काही वर्षात बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड्सना लोकांनी विशेष पसंती दिली आहे. LIC म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड (LIC MF Balanced Advantage Fund) इक्विटी भागासाठी योगेश पाटील यांची तर डेट भागासाठी राहुल सिंह यांची निधी व्यवस्थापक (Fund Manager)म्हणून नियुक्ती केली जाईल. हे कस्टमाइज्ड इंडेक्स LIC MF हायब्रिड कम्पोझिट 50:50 निर्देशांकाच्या विरोधात आहे. गुंतवणूकदारांना इक्विटी टॅक्सेशन बेनिफिट्सचा (Equity Taxation Benefits) लाभ देण्यासाठी, फंडाचे लक्ष्य ग्रॉस इक्विटी एलोकेशन 65 टक्के किंवा त्यापेक्षा असणे आवश्यक आहे.

हे वाचा-काढणी चालू असताना शेतकऱ्यांना चिंता; दर घसरणीमुळं सोयाबीनची आवकही घटली

बॅलन्स अॅडव्हांटेज फंड्सना प्राधान्य दिले जाते कारण मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (एएमसी) त्यांच्या प्रभावी इक्विटी एक्सपोजर 65 टक्क्यांपेक्षा कमी करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह्ज वापरतात. त्याच वेळी, ग्रॉस एक्सपोजर 65 टक्के किंवा त्याहून अधिक ठेवतात. जर एका इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडाला एका वर्षानंतर रिडिम केले तर गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयांपेक्षा जास्त भांडवली नफ्यावर 10 टक्के कर (Capital Gains Tax) आकारला जातो.

First published:

Tags: Investment, Money