मराठी बातम्या /बातम्या /मनी /LIC ची पॉलिसीधारकांसाठी Good News! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार

LIC ची पॉलिसीधारकांसाठी Good News! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार

 देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगमनं (LIC) एक खास मोहीम सुरू केली आहे. या मोहिनेनुसार एखादी बंद पडलेली LIC पॉलिसी देखील पुन्हा सुरू करता (LIC Policy Revival) येईल.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगमनं (LIC) एक खास मोहीम सुरू केली आहे. या मोहिनेनुसार एखादी बंद पडलेली LIC पॉलिसी देखील पुन्हा सुरू करता (LIC Policy Revival) येईल.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगमनं (LIC) एक खास मोहीम सुरू केली आहे. या मोहिनेनुसार एखादी बंद पडलेली LIC पॉलिसी देखील पुन्हा सुरू करता (LIC Policy Revival) येईल.

मुंबई, 9 जानेवारी :  कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीमुळे (Pandemic) अनेकांमध्ये आरोग्याबाबत जागृती वाढली आहे. आयुष्यतील संभाव्य धोके कव्हर करण्यासाठी अनेकांचा गेल्या काही महिन्यात आरोग्य विमा (Health Insurance) खरेदी करण्याकडं कल वाढला आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगमनं (LIC) या सर्वांसाठी एक खास मोहीम सुरू केली आहे. या मोहिनेनुसार एखादी बंद पडलेली LIC पॉलिसी देखील पुन्हा सुरु करता (LIC Policy Revival) येईल. 7 जानेवारी ते 6 मार्च या दरम्यान ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

काय आहे मोहीम?

एखादी पॉलिसी काही कारणांमुळे बंद पडली असेल तर त्या पॉलिसीधारकांना आणखी एक संधी या योजनेत मिळणार आहे. अर्थात त्यासाठी काही अटींचं त्यांना पालन करावं लागेल. LIC नं या मोहिमेसाठी खास 1,526 कार्यालयांची निवड केली आहे. त्या कार्यालयामध्ये ही पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही मेडिकल टेस्टची गरज नसेल.

(हे वाचा-Budget 2021: जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला माहित नसणाऱ्या या रंजक गोष्टी)

काय आहेत अटी?

LIC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ज्यांची पॉलिसी पेमेंट न केल्यामुळे मागील पाच वर्षात बंद पडली आहे, अशा पॉलिसीधाराकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर त्यांची तब्येत लक्षात घेऊन काही सवलती देखील दिल्या जातील. मात्र Covid-19 संबधीच्या काही प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यावी लागणार आहेत. LIC नं यापूर्वी देखील 10 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबर 2020 या दरम्यान ही योजना राबविली होती.

नव्या योजनेची वैशिष्ट्यं

या योजनेनुसार पॉलिसीधारकांना लेट फीमध्ये 20 टक्के किंवा 2 हजार रुपयांची सुट मिळणार आहे. 1 लाख ते 30 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक प्रीमियम पॉलिसीवर 25 टक्के सुट असेल.

(हे वाचा-2 लाखांपर्यंत दागिने खरेदी करण्यासाठी लागणार KYC?अर्थ मंत्रालयाने दिली ही माहिती)

प्रीमियम भरण्याच्या काळात बंद पॉलिसीच या योजनेनुसार सुरु करता येणार आहे. त्याचबरोबर ही पॉलिसी सुर करण्यासाठी अंतिम तारीख देखील दिली जाणार आहे.

‘विमा कव्हर सुरु करण्यासाठी जुनी पॉलिसी पुन्हा सुरु करणं हा एक चांगला पर्याय आहे’, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. स्वत:ला आणि कुटुंबीयांना जीवन कवच देण्यासाठी ही एक चांगली योजना असल्याचं त्यांनी सांगितलं. LIC चे देशभरात सध्या 30 कोटी ग्राहक आहेत.

First published:

Tags: Insurance, Money