मुंबई : शेतकऱ्यांना पीएम किसना योजनेचा 12 वा हप्ता मिळण्यासाठी दीड महिना जवळपास उशीर झाला होता. आता 13 वा हप्ता कधी मिळणार याची प्रतिक्षा संपली आहे. 13 व्या हप्त्याची तारीख समोर आली आहे. शेतकऱ्यांनी अजूनही E KYC केलं नसेल तर तातडीनं करून घ्यावं. नाहीतर ह्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पीएम मोदींनी अलीकडेच पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता जारी केला आहे. 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले आहेत. आता या योजनेचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे.
पीएम किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याच कारणामुळे या योजनेबाबत स्वत: पंतप्रधान मोदींनी अनेक व्यासपीठांवरून शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा केली आहे.
पीएम किसान सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील करोडो शेतकर्यांना नवीन बळ देत आहेत असं पंतप्रधान मोदी ट्विट करून म्हणाले होते.
शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे?
पीएम किसानचा पुढील हप्ता लवकरच येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत, तर दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दिला जातो.
30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. 2000 रुपये 30 नोव्हेंबरपर्यंत जमा होऊ शकतात.
अडचण आली तर कुठे मदत मिळेल?
तुम्हाला काही समस्या येत असल्यास, ते लवकर सोडवा. यासाठी हेल्पलाइन नंबरवर कॉल करून किंवा मेल आयडीवर मेल करून तुम्ही उपाय काढू शकता.
पीएम किसानचा हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तुम्ही तुमची तक्रार इमेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वर पाठवू शकता. तुम्ही आतापर्यंत अर्ज केला नसेल तर अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन नोंदणी करा.
E KYC आवश्यक
ज्या शेतकऱ्यांनी E KYC केलं नाही त्यांना 12 वा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे अजूनही तुमचं पेंडिंग असेल तर ते पूर्ण करा. नाहीतर आताही पैसे खात्यात येणार नाहीत. पीएम किसान योजनेच्या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन तुम्हाला E KYC करायचं आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कसं करायचं E-KYC वापरा ही सोपी पद्धत
बँकेचे डिटेल्स योग्य प्रकारे भरले नाहीत तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. बँकेचे खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड चुकीच्या पद्धतीने भरला असेल तर शेतकऱ्याला पैसे मिळणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Modi government, Pm modi