मुंबई, 6 नोव्हेंबर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12वा हप्ता तुमच्याही खात्यात आला असेल. आता 13व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू झाली आहे. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना एक मोठा अपडेट दिला आहे. तुम्ही नवीन नियम न पाळल्यास 13व्या हप्त्यात अडचण येऊ शकते, असे म्हटले आहे. देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत, तर 2 कोटींहून अधिक शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
13व्या हप्त्याचे पैसे अडकू नयेत असे वाटत असेल तर तुम्ही नवीन नियम नीट पाळले पाहिजे. आता शेतकऱ्यांना नोंदणीसाठी शिधापत्रिकेची सॉफ्ट कॉपी द्यावी लागणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. म्हणजेच आता हार्ड कॉपी देण्याची गरज राहणार नाही. पोर्टलवर सॉफ्ट कॉपी PDF अपलोड करता येईल. यासोबतच ई-केवायसी करणेही आवश्यक असेल. या दोन कागदपत्रांशिवाय तुम्हाला तेराव्या हप्त्याचे पैसे अवघड आहे.
आधी कशी प्रक्रिया होती?
आतापर्यंत शेतकर्यांना त्यांची नोंदणी करण्यासाठी भूलेख, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करावी लागत होती. आता ही प्रक्रिया संपली असून फक्त सॉफ्ट कॉपी जमा करायची आहे. आता या नियमामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून पारदर्शकताही वाढणार आहे. अनेक शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.
वाचा - तेलंगणातील 'या' व्यक्तीनं केली दोन लाख वृक्षांची लागवड; पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित केलं आयुष्य
हे डॉक्युमेंट देखील आवश्यक
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने आणखी काही कागदपत्रे आवश्यक केली आहेत. शेतकऱ्यांसाठी आधार असणे आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, आधार नसलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार नाही. या वेळी हप्त्याची रक्कम न मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण असून, त्यांची भूलेख अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे.
किसान क्रेडिट कार्ड मिळवणे झाले सोपे
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने किसान क्रेडिट कार्डला पीएम किसान योजनेशी जोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना KCC म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड मिळणे सोपे झाले आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेशी संबंधित आहेत, त्यांना केसीसी सहज मिळते. यावरील व्याजदर खूपच कमी असून बँकाही शेतकऱ्यांना कमी व्याजावर सुलभ कर्ज देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.