मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कसं करायचं E-KYC वापरा ही सोपी पद्धत

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कसं करायचं E-KYC वापरा ही सोपी पद्धत

ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केलं नाही त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.

ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केलं नाही त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.

ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केलं नाही त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : कोणत्याही बँकेत खातं असो आता तुमच्या खात्याला केवायसी करणं गरजेचं आहे. जर केवायसी केलं नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जसं प्रत्येक खात्याला ग्राहकांना केवायसी बंधनकारक आहे तसंच शेतकऱ्यांनाही हा नियम बंधनकारक केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केलं नाही त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.

तुमच्या घरातील किंवा ओळखीचे कोणी जर ही योजना घेत असतील तर त्यांना ही बातमी नक्की सांगा. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवायसी करणं बंधनकारक आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १२ वा हप्ता न जमा होण्यामागे देखील हेच मोठं कारण आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही केवायसी केलं नसेल तर वेळ घालवू नका. तुम्ही लगेच E KYC करून घ्या.

आताही करता येणार E KYC

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने हे काम करण्याची आणखी एक संधी दिली आहे. पंतप्रधान सीना सन्मान निधी योजना https://pmkisan.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या संदेशानुसार, शेतकरी अजूनही पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी करू शकतात.

कसा करायचं KYC

2 प्रकारे पंतप्रधान किसानसाठी ई-केवायसी पूर्ण करू शकतात. अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन करता येऊ शकतं. याशिवाय जवळच्या सर्व्हिस सेंटरला (सीएससी) भेट देऊनही शेतकरी आपले ई-केवायसी करून घेऊ शकतात. शेतकरी स्वत: ओटीपीद्वारे ई-केवायसी करत असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत, तर कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी करून घेतल्यास त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील.

pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन लॉगइन करा. फार्मर्स कॉर्नर हा पर्याय निवडा आणि तिथे e-KYC पर्याय निवडा. नवीन पेज सुरू होईल. तिथे आधार नंबर अपलोड करा आणि त्याआधारे सर्च करा. सजिस्टर मोबाईल नंबर अपलोड करा. जो OTP येईल तो अपलोड करा. तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होईल. तुम्ही अजूनही ही प्रक्रिया केली नसेल तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

First published:

Tags: Farmer, Modi government