जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PM Kisan Samman Nidhi: 'या' चुका केल्या तर खात्यात येणार नाहीत पैसे, केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना इशारा

PM Kisan Samman Nidhi: 'या' चुका केल्या तर खात्यात येणार नाहीत पैसे, केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना इशारा

PM Kisan Samman Nidhi:  'या' चुका केल्या तर खात्यात येणार नाहीत पैसे, केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना इशारा

यावेळी केंद्र सरकारने 13 व्या हप्ता देण्यासाठी नियमही कठोर केले आहेत. तुमची एक चूक मोठं नुकसान करू शकते

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. अनेक शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याला लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांनी नेमक्या कोणत्या चुका केल्या होत्या आणि त्या सुधारल्या नाही तर पुन्हा 13 वा हप्ता येणार नसल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या चुका आपल्याकडून होणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 12वा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. तेरावा हप्ता मिळावा यासाठी शेतकरी तयारी करत आहेत. यावेळी केंद्र सरकारने हप्ते देण्यासाठी नियमही कठोर केले आहेत. शेतकरीही छोट्या-छोट्या चुका करतात. त्यामुळे त्यांच्या खात्यापर्यंत पैसे पोहचत नाहीत. तुम्ही या केल्या असतील तर आताच सुधारा नाहीतर 13 वा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही. e- KYC आवश्यक फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने E KYC बंधनकारक केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी E KYC केलं नाही त्यांना 12 वा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे अजूनही तुमचं पेंडिंग असेल तर ते पूर्ण करा. नाहीतर आताही पैसे खात्यात येणार नाहीत. पीएम किसान योजनेच्या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन तुम्हाला E KYC करायचं आहे. बँक खातं आणि आधार कार्डची माहिती देशात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड वापरलं जातं. आधार कार्डची माहिती वैध समजली जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या बँक पासबुक आणि आधार कार्डवरील नाव किंवा इतर तपशील वेगळे असेल तर त्रास होऊ शकतो. नावांच्या अक्षरात फरक पडला किंवा नाव वेगळे असले तरी शेतकऱ्याला ती रक्कम मिळत नाही.

Wardha : पारंपारिक शेतीला फाटा देत रेशीमधून मिळवलं लाखोंच उत्पन्न, पाहा Video

नावात चूक असेल तर शेतकऱ्यांच्या आधार कार्डवर किंवा कोणत्याही फॉर्मवर अथवा बँकेतील नावात चूक असेल तर. त्यामुळे डॉक्युमेंट मॅच होऊ शकत नाही. तुमचं नाव चुकीचं येतं. त्यामुळे शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळू शकणार नाही. त्याआधी तुम्ही नाव दुरुस्त करुन घ्या. बँकेचे डिटेल्स भरतानाच चूक झाली तर बँकेचे डिटेल्स योग्य प्रकारे भरले नाहीत तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. बँकेचे खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड चुकीच्या पद्धतीने भरला असेल तर शेतकऱ्याला पैसे मिळणार नाहीत. पत्ता बरोबर नसेल तर नोंदणीच्या वेळी शेतकऱ्याचे प्रत्येक अपडेट योग्य असले पाहिजे. शेतकरी कधीकधी तपशील भरताना काही गोष्टी वगळतात किंवा विसरतात. अनेक वेळा पत्त्याचा तपशील भरण्यातही चूक होते. सर्व काही ठीक आहे, हे शेतकरी समजून घेतो, पण ते योग्य नाही आणि शेतकऱ्याला पैसेही मिळत नाहीत.

भन्नाट! दिव्यांग व्यक्तीनं खराब फ्रिजचा वापर करुन बनवलं हॅचिंग मशीन, Video
News18लोकमत
News18लोकमत

यावेळी बारावा हप्ता शेतकऱ्यांना वेळेवर मिळू शकला नाही. सुमारे एक ते दीड महिना शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १६ हजार कोटी रुपयांची रक्कम पाठवली होती. साडेचार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले नाहीत. तपासात हे शेतकरी अपात्र असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात