Home /News /money /

नजरचुकीनं दुसऱ्याच खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास परत मिळतील का? वाचा सविस्तर

नजरचुकीनं दुसऱ्याच खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास परत मिळतील का? वाचा सविस्तर

आपल्याकडून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास काय करावं, याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) वेबसाइटवर माहिती दिलेली आहे.

मुंबई, 06 जानेवारी: सध्या थेट बँकेत जाऊन व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन (Online transaction) करण्यावर जास्त भर दिला जातो. मात्र, कधी-कधी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करताना चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. अनावधानानं झालेल्या या चुकीनंतर पैसे बुडण्याचं संकट समोर येतं. अशा परिस्थितीत, चुकून दुसऱ्याच्या खात्यात (wrong transaction) गेलेले आपले पैसे परत मिळतात का? त्यासाठी काय करावं लागतं? यासाठी काय नियम आहेत? असे अनेक प्रश्न मनात येतात. आरबीआयच्या (RBI) नियमांनुसार, पेमेंट इन्स्ट्रक्शनमध्ये (Payment Instruction) लाभार्थ्याचा खाते क्रमांक आणि इतर सर्व माहिती अचूकपणे भरणं, ही पैसे पाठवणाऱ्याची (Remitter/Originator) जबाबदारी आहे. इन्स्ट्रक्शन रिक्वेस्टमध्ये (Instruction Request) लाभार्थ्याचं नाव देणंही आवश्यक आहे. जर तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील किंवा खात्याचे तपशील अवैध असतील तर काळजी करण्याची गरज नाही. तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत येऊ शकतात. काय आहेत आरबीआय गाईडलाइन्स? आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 'होणारा व्यवहार हा केवळ लाभार्थीच्या खाते क्रमांकाच्या माहितीच्या आधारे केला जाईल, अशा स्वरुपाचा एक डिस्क्लेमर बँकांनी ऑनलाइन किंवा इंटरनेट बँकिंग (Internet Banking) प्लॅटफॉर्ममधील फंड ट्रान्सफर स्क्रीनवर आणि फंड ट्रान्सफर रिक्वेस्ट फॉर्ममध्ये टाकला पाहिजे. यासाठी लाभार्थीचं नाव वापरलं जाणार नाही.' हे वाचा-Budget 2022-23: अर्थसंकल्प ठरणार शेतकऱ्यांसाठी खूशखबर! काय आहे सरकारचा प्लान? सामान्यत: बँकांनी रक्कम खात्यात जमा करण्यापूर्वी लाभार्थीच्या नावं आणि खाते क्रमांक (Account Number) यांचा ताळमेळ साधणं अपेक्षित आहे, असंही आरबीआयच्या गाईडलाइन्समध्ये म्हटलं गेलं आहे. चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे गेल्यास काय करावं? आपल्याकडून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास काय करावं, याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) वेबसाइटवर माहिती दिलेली आहे. बेवसाइटवरील माहितीनुसार, जर पैसे पाठवण्यासाठी आवश्यक असलेले लाभार्थीचे तपशील (जसं की MMID, मोबाइल नंबर) चुकीचे असल्यास ट्रान्झॅक्शन कॅन्सल होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. जर तुम्ही खाते क्रमांकाचा वापर करून पैसे पाठवणार असाल तर तो क्रमांक योग्यरित्या तपासला पाहिजे कारण या आधारावरच पैसे ट्रान्सफर होतात. सर्वात अगोदर बँकेला कल्पना द्या अनावधानाने चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास सर्वात अगोदर आपल्या बँकेला याची कल्पना दिली पाहिजे. यासाठी तुम्ही कस्टमर केअर (Customer care) नंबरद्वारे तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता किंवा प्रत्यक्ष शाखेतही जाऊ शकता. बँकेमध्ये आपली तक्रार नोंदवताना ट्रान्झॅक्शनची तारीख (Transaction date), वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि ज्या खात्यात पैसे पाठवले गेले आहेत तो क्रमांक याची बँकेत नोंद करावी. शक्य असल्यास ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉटसुद्धा बँकेत जमा करा. यानंतर तुमची बँक तुम्हाला समोरच्या बँकेची आणि खात्याची माहिती पुरवेल. जर चुकीचं ट्रान्झॅक्शन झालेली बँक आणि तुमची बँक एकच असेल तर तुम्हाला थेट खातेधारकाचे सर्व तपशील मिळू शकतात. ती माहिती घेऊन तुम्ही संबंधित व्यक्तीला पैसे परत करण्याची विनंती करू शकता. हे वाचा-राजकुमार रावने सर्वांना केलं सावध! अभिनेत्याच्या नावाने 3 कोटी उकळण्याचा डाव दुसऱ्या बँकेतून पैसे परत मिळवण्यास लागू शकतो वेळ जर ट्रान्झॅक्शन दुसऱ्या बँक खात्यात झालं असेल तर पैसे परत मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत, ज्या बँक शाखेत संबंधित खातं आहे त्या शाखेशी संपर्क साधून अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर ती बँक तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवण्यास मदत करेल. ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याच्याशी बँक संपर्क करेल आणि त्या व्यक्तीच्या संमतीनं चुकून पाठवलेले गेलेले पैसे तुम्हाला परत करेल. ...तर येऊ शकते अडचण ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत तिच्या संमतीशिवाय पैसे परत मिळवता येणार नाहीत. ते पैसे आपले नाहीत, नजर चुकीनं ते आपल्या खात्यात आले आहेत, या गोष्टी त्या व्यक्तीनं मान्य करणं गरजेचं आहे. असं झालं तरच बँक हे चुकीचं ट्रान्झॅक्शन रद्द करू शकते आणि तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र, त्यासाठी वेळ आणि कष्ट दोन्हीही लागतात. म्हणून कुठलंही ट्रान्झॅक्शन करताना सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून मगच पैसे पाठवावेत.
First published:

Tags: Bank, Bank details, Business News, Money, Rbi, SBI

पुढील बातम्या