मुंबई, 06 जानेवारी: गेल्या काही काळापासून इंटरनेट बँकिंगच्या वापरामध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सायबर क्राइमच्या (
Cyber Crime) घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अनेकदा आपल्याला WhatsApp, E-mail, SMS यावर मोहात टाकणाऱ्या ऑफर्स दिल्या जातात. पण अशाप्रकारच्या फेक मेसेजपासून तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. तुम्ही या मेसेजमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास, मेलना रिप्लाय दिल्यास तुमची आयुष्यभराची कमाई गमावून बसू शकता. अशाप्रकारे बनावट लोकांपासून वाचण्यासाठी बँका, आरबीआय यांच्याकडून वेळोवेळी सावध केले जाते. मात्र तरीही अनेकजण सायबर क्राइमची शिकार होतात. बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावनेही (Rajkumar Rao) लोकांना त्याच्यासह घडलेला प्रकार शेअर करत सावध केले आहे. अभिनेत्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची मागणी केली जात आहे, त्यासंदर्भात त्याने अलर्ट केले आहे.
राजकुमार रावच्या नावाने फसवणूक करण्याचा प्लान
राजकुमार रावच्या नावाने या ठगांनी बनावट ईमेल आयडी तयार करून लोकांकडून 3 कोटी रुपये उकळण्याचा कट रचला आहे. अभिनेत्याने बनावट ईमेलचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याच्या नावावर चित्रपट करारासाठी 3 कोटी 10 लाख रुपयांची मागणी केली जात आहे.
हे वाचा-मंदिरात जाण्याचं व प्रदक्षिणा मारण्याचं कारण काय ? सारानं दिलं उत्तर
राजकुमारला या फसवणुकीची कल्पना आल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. राजकुमार रावने असे लिहिले आहे की, 'फेक, कृपया अशा लोकांपासून सावध रहा. सौम्या नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. हे लोक बनावट ईमेल आयडी आणि मॅनेजर्सचा वापर करून लोकांना मूर्ख बनवत आहेत.'
मेलमध्ये काय म्हटले आहे?
राजकुमारने मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये लिहिले आहे, 'हाय अर्जुन, तुमचे माझी मॅनेजर सौम्या यांच्याशी झालेल्या शेवटच्या संभाषणानुसार, मी संतोष मस्की लिखित आणि तेच दिग्दर्शित करणार असणाऱ्या 'हनीमून पॅकेज' नावाचा चित्रपट करण्यास तयार आहे. मी सध्या मुंबईत नाही, त्यामुळे मी मेलवरच माझी संमती पाठवत आहे. स्वाक्षरी प्रक्रिया आणि स्क्रिप्ट, मेल केलेल्या कराराची हार्ड कॉपी मी मुंबईला पोहोचल्यावर पूर्ण करेन'.
हे वाचा-तुमच्यासाठी खुर्ची सोडू पण..रोहित पवारांनी पंकजा व प्रणिती शिंदेंना घातली अट
त्यात पुढे असं म्हटलं आहे की, 'या कराराचा विचार तेव्हाच केला जाईल जेव्हा माझ्या बँक खात्यात 3 कोटी 10 लाख (एकूण शुल्काच्या 50%) जमा होतील किंवा माझी मॅनेजर सौम्याने सांगितल्यानुसार की तुम्ही मला 10 लाख रोख आणि 3 कोटी चेकने द्याल. मी 6 जानेवारी रोजी हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी याठिकाणी नरेशनसाठी येऊ शकतो. तुम्ही, दिग्दर्शक आणि निर्माता या सर्वांना मेलद्वारेच आमंत्रित करत आहे. विनम्र राजकुमार राव'.
हे पहिल्यांदा होत नाही आहे की एखाद्या बड्या कलाकाराचं नाव वापरुन सामान्यांना फसवलं जातं. अनेकदा बॉलिवूडमध्ये काम देण्याच्या बहाण्याने देखील लोकांकडून पैसे उकळले जातात. अशावेळी तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.