नवी दिल्ली, 22 जुलै: देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) नेहमी त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवत असते, अपग्रेडेशन संदर्भात सूचना देत असते किंवा एखादी समस्या आल्यास त्याचं निरसन कसं करावं याबाबत माहिती देत असते. बँक व्यवहार करताना ग्राहकांना काही समस्यांना सामोरं जावं लागतं. विशेष करुन सध्या डिजिटल व्यवहार (Digital Transaction) वाढले असले तरी अद्याप अनेकांना ऑनलाइन व्यवहार अंगवळणी पडलेलं नाही. त्यामुळे अनेकदा काही चुका होतात, ज्यामुळे ग्राहकांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. काही ग्राहकांनी अशीही तक्रार केली आहे की त्यांनी चुकून भलत्याच बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर केले आहेत. तुमच्याबरोबर असं घडल्यास काय कराल, वाचा एसबीआयने (SBI) काय म्हटलं आहे.. हे वाचा- ICICIच्या ग्राहकांना झटका! 1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल,या सेवांसाठी शुल्क वाढणार अलीकडेच एका महिलेने असं ट्वीट केलं होतं की त्यांनी चुकीच्या खात्यामध्ये एक लाख रुपये ट्रान्सफर केले आहे आणि ते रिफंड करण्यात त्यांची कुणी मदत करत नाही आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एसबीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटला टॅग केले आहे. यावर रिप्लाय देताना एसबीआयने असं म्हटलं आहे की, ‘डिजिटल ट्रान्सफर करण्यापूर्वी ग्राहकांनी लाभार्थ्याच्या खात्याच्या तपशील तपासून घेण्याची आम्ही विनंती करतो. ग्राहकांकडून करण्यात आलेल्या कोणत्याही चुकीच्या ट्रान्झॅक्शनसाठी बँक जबाबदार नाही. दरम्यान कोणत्याही जबाबदारीशिवाय ग्राहकाची होम ब्रँच अन्य बँकेकडून फॉलोअप घेऊ शकते. कृपया तुमच्या होम बँचशी आणि संबंधित बेनिफिशयरी बँकेशी संपर्क करा.’
Customers are requested to verify the accuracy of the beneficiary account details before initiating a digital transfer. Kindly note that the Bank will not be responsible for any erroneous transaction initiated at the customer's end. However, the home branch of the (1/2)
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 22, 2021
या गोष्टी लक्षात ठेवा -सर्वात आधी डिजिटल ट्रान्झॅक्शन करताना तुम्ही प्रविष्ट केलेला लाभार्थ्याचा तपशील योग्य आहे की नाही तपासा -डिजिटल व्यवहार करताना लाभार्थ्याचं नाव, बँक तपशील तपासून घ्या -घाईघाईत व्यवहार करणं टाळा हे वाचा- SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचे! मोबाइलमध्ये सेव्ह असतील हे नंबर तर खातं होईल रिकामं पैसे परत मिळतील का? -एखाद्याला पैसे ऑनलाइन पाठवताना समोरच्या व्यक्तीशी संपर्क करून पैसे मिळाले की नाही याबाबत विचारणा करा -पत्येक बँकेनुसार काही ठराविक कालावधीमध्ये लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होतात, त्या वेळेत पैसे न मिळाल्यास बँकेशी संपर्क साधा -तुम्ही चुकून एखाद्याच्या खात्यात पैसे पाठवले असाल तर त्या व्यक्तीशी संपर्क करून तुम्ही पैशांबाबत विचारणा करू शकता. पैसे प्राप्त करणारा तुम्हाला पैसे पाठवण्यास तयार झाला आणि त्याने तुम्हाला पैसे परत केले तर शक्यतो सात दिवसांच्या आतमध्ये तुमच्या खात्यात ते जमा होतील. -बँकेने तुमच्या तक्रारीनंतर कोणतंही पाऊल न उचलल्यास तुम्ही Ombudsman कडे तक्रार करू शकता