SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, मोबाइलमध्ये सेव्ह असतील हे नंबर तर खातं होईल रिकामं; त्वरित करा डिलीट

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) तुमचं खातं असेल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही हे काही क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवले असतील तुमचं बँख खातं रिकामं होण्याची भीती आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) तुमचं खातं असेल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही हे काही क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवले असतील तुमचं बँख खातं रिकामं होण्याची भीती आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 जुलै: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) तुमचं खातं असेल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही हे काही क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवले असतील तुमचं बँख खातं रिकामं होण्याची भीती आहे. SBI ने ग्राहकांना अलर्ट पाठवत याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयच्या वेबसाइटच्या मते, देशभरात वाढणाऱ्या फ्रॉडमुळे सर्वांना सावधानता बाळगणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या खात्याशी संबंधित कोणतीही माहिती फोनमध्ये सेव्ह करू नये. तुम्ही तुमच्या फोनमध्ये एखादा ओटीपी (वन टाइम पासवर्ड), पिन नंबर, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा CVV किंवा एटीएम डिटेल्स सेव्ह केले असाल, तर त्वरित ही माहिती डिलीट करा. ग्राहकांना अशी चूक करू नये असं एसबीआयने म्हटलं आहे. नाहीतर तुमचं खातं रिकामं होण्याची भीती आहे. बँकेने अशी माहिती दिली आहे बँक खातं आणि ऑनलाइन बँकिंगची माहिती फोनमध्ये सेव्ह करू नका. कधीही सेव्ह करू नका हे क्रमांक बँकेने असं म्हटलं आहे की, तुमचा बँक खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांक किंवा या तपशीलांचा फोटो कधीही फोनमध्ये सेव्ह करू नका. ही माहिती फोनमधून लीक होण्याची शक्यता असते. यामुळे तुमचं खातं पूर्णपणे रिकामं होऊ शकतं. हे वाचा-ICICIच्या ग्राहकांना झटका! 1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल,या सेवांसाठी शुल्क वाढणार ही माहित कुणाबरोबर करू नका शेअर याशिवाय बँक वेळोवेळी सल्ला देत असते की तुमच्या एटीएमचे डिटेल्स, क्रेडिट कार्ड-डेबिट कार्डचा तपशील, यावरील सीव्हीव्ही क्रमांक, एटीएम पिन कुणाबरोबरही शेअर करू नका. काही वेळा फसवणूक करणारे बँकेचे अधिकारी भासवून ग्राहकांना फोन करतात आणि अशी माहिती मिळवतात. मात्र हे लक्षात घेणं गरजेचं आहे बँक फोन करून अशाप्रकारे कोणताही तपशील विचारत नाही. अशाप्रकारे तुमची माहिती लीक झाल्यास खात्यातील पैसे लंपास व्हायला वेळ लागणार नाही. हे वाचा-Ration Card आहे महत्त्वाचा दस्तावेज, वाचा कशाप्रकारे बनवाल नवीन कार्ड? सार्वजनिक असणाऱ्या इंटरनेटचा नका करू वापर स्टेट बँकेच्या मते, ग्राहकांनी पब्लिक इंटरनेटचा वापर करताना सावधानता बाळगायला हवी. हे इंटरनेट वापरताना बँकेचे कोणतेही व्यवहार करू नका. अशाप्रकारे ऑनलाइन व्यवहार केल्यास तुमची माहिती लीक होऊ शकते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: