नवी दिल्ली, 22 जुलै: देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेमध्ये (ICICI Bank) तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या खाजगी बँकेत 1 ऑगस्टपासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. 1 ऑगस्टपासून एटीएममधून (ATM Interchange Charges) पैसे काढणं देखील महागणार आहे. ICICI बँक ग्राहकांना 4 फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा देते. तुम्ही यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करून पैसे काढले तर तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. हा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे. जाणून घ्या किती शुल्क द्यावे लागेल आणि आणखी कोणते बदल बँकेत होणार आहेत.
1. एक ऑगस्टपासून होणार हे बदल
>> ऑगस्ट महिन्यापासून ICICI च्या ग्राहकांना त्यांच्या होम ब्रँचमधून दरमहा 1 लाख रुपये काढता येतील
>> त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल.
>> होम ब्रँच नसणाऱ्या शाखेमध्ये प्रति दिन 25000 रुपयांच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क नाही आहे.
>>त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल.
हे वाचा-Gold Jewellery बाबतचा हा निर्णय होणार रद्द? वाचा काय आहे सरकारचं स्पष्टीकरण
2. चेकबुकवर द्यावं लागेल इतकं शुल्क
>> तुम्हाला वर्षाला 25 पानांच्या चेकबुकसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही.
>> यानंतर अतिरिक्त चेक बुकसाठी 20 रुपये प्रति 10 पानं द्यावे लागतील.
हे वाचा-Post Office ची ही योजना ठरेल फायद्याची, कमी गुंतवणुकीतून कसे मिळतील 16 लाख?
3. ATM इंटरचेंज ट्रान्झॅक्शन
>>बँकेच्या वेबसाइटनुसार, एटीएम इंटरचेंज ट्रान्झॅक्शनवर देखील शुल्क आकारले जाईळ.
>> 6 मेट्रो लोकेशन्सवर एका महिन्यात पहिले तीन ट्रान्झॅक्शन फ्री असतील.
>> एक महिन्यासाठी इतर ठिकाणी पहिले पाच ट्रान्झॅक्शन मोफत असतील.
>>यानंतर 20 रुपये प्रति आर्थिक व्यवहार आणि 8.50 रुपये प्रति गैर-आर्थिक व्यवहार शुल्क द्यावे लागेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, Bank details, Icici bank