मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI चा रेपो रेट कमी न करण्याचा निर्णय, व्याजदर कमी झाल्यास काय होतो सामान्यांवर परिणाम?

RBI चा रेपो रेट कमी न करण्याचा निर्णय, व्याजदर कमी झाल्यास काय होतो सामान्यांवर परिणाम?

आरबीआयने व्याजदरात (Repo Rate and Reverse Repo Rate) मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जर आरबीआयने नीतीगत व्याजदर कमी जास्त केले तर त्याचा सामान्यांवर काय परिणाम होतो, जाणून घ्या

आरबीआयने व्याजदरात (Repo Rate and Reverse Repo Rate) मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जर आरबीआयने नीतीगत व्याजदर कमी जास्त केले तर त्याचा सामान्यांवर काय परिणाम होतो, जाणून घ्या

आरबीआयने व्याजदरात (Repo Rate and Reverse Repo Rate) मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जर आरबीआयने नीतीगत व्याजदर कमी जास्त केले तर त्याचा सामान्यांवर काय परिणाम होतो, जाणून घ्या

नवी दिल्ली, 04 डिसेंबर: कोरोना व्हायरस पँडेमिक (Coronavirus Pandemic) मधून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी सरकारसोबतच भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) सातत्याने उपाययोजना आखत आहे. तीन दिवस पार पडलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण आढावा (RBI Monetary Policy) बैठकीत व्याजदरांमध्ये कोणताही बदलाव न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आरबीआयने नीतिगत व्याजदरांमध्ये बदलाव केल्यास सामान्यांच्या EMI वर कसा परिणाम होतो, जाणून घ्या.

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट (repo rate)कमीजास्त केल्यावर बँका व्याजदर बदलतात त्यामुळे सामान्य माणूस आणि उद्योजक दोघांचंही रेपो रेटकडे लक्ष असतं. व्याज दरातल्या बदलाचा अर्थ असा असतो की त्या पुढे जेव्हा बँका रिझर्व्ह बँकेकडून निधी घेतील तेव्हा त्यांना नव्या व्याजदराने पैसे घ्यावे लागतील. जर बँकांना कमी व्याजदराने निधी मिळाला तर बँका ग्राहकांनाही सवलत देतात. स्वस्त कर्ज आणि कमी झालेला ईएमआय (EMI) या स्वरूपात बँका ग्राहकांना फायदा मिळतो. त्यामुळे रेपो रेट कमी झाला की तुम्हाला स्वस्त कर्ज मिळू शकतं आणि ज्यांचं कर्ज फ्लोटिंग आहे त्यांचा ईएमआय देखील कमी होतो.

(हे वाचा-व्याजदरात कोणताही बदल नाही, सामान्यांना स्वस्त EMIसाठी वाट पाहावी लागणार)

रिझर्व्ह बँकेच्या क्रेडिट पॉलिसीसंबंधात तुम्ही रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट (reverse repo rate) आणि सीआरआर असे शब्द ऐकले असतील. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक समीक्षा धोरणाशी संबंधित या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित आहेत का?

रेपो रेट म्हणजे काय?

आरबीआय व्यापारी बँकांना किंवा इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट कमी झाला तर त्यानंत गृह कर्ज, वाहन कर्ज देखील स्वस्त दरात उपलब्ध होते.

रिव्हर्स रेपो रेट काय असतो?

बँकांनी रिझर्व्ह बँकेत ठेवलेल्या ठेवींवर त्यांना मिळणाऱ्या व्याज दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. बाजारातील रोख रकमेवर नियंत्रण ठेवण्याचं काम रिव्हर्स रेपो रेट करतो. बाजारात मोठ्या प्रमाणात रोकड आली तर रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट वाढवते.

(हे वाचा-RBI ने पुरवठा बंद केल्याने ATM मधून नाही येत आहेत 2 हजाराच्या नोटा? काय आहे सत्य)

SLR काय असतं?

बँक आपले पैसे ज्या दराने सरकारकडे ठेवते त्याला एसएलआर म्हणतात. बाजारातील रोख रकमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर करतात. व्यापारी बँकांना एक विशिष्ट रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करायची असते ज्याचा उपयोग आणिबाणीतील व्यवहारांसाठी केला जातो.

CRR म्हणजे काय?

बँकिंगच्या नियमांनुसार प्रत्येक बँकेला आपल्या एकूण रोक रकमेचा एक निश्चित वाटा रिझर्व्ह बँकेमध्ये जमा करावा लागतो ज्याला CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतात.

MSF काय असतं?

आरबीआयने याची सुरुवात 2011 मध्ये केली होती. MSF अंतर्गत व्यापारी बँकेने रिझर्व्ह बँकेत ठेवलेल्या एकूण ठेवीच्या 1 टक्का रकमेचं कर्ज केवळ एका रात्रीसाठी घेऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Rbi, Shaktikanta das