नवी दिल्ली, 03 डिसेंबर: सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की आरबीआयने (Reserve Bank of India) बँकाना 2000 च्या नोटांचा पुरवठा बंद केला आहे. यामुळे अधिकतर एटीएममधून केवळ 100, 200 आणि 500 च्या नोटा येत आहेत. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेकजण काळजीत आहेत. 8 नोव्हेंबर 2016 सारखीच नोटबंदी तर झाली नाही ना अशा शंका अनेकांच्या मनात उपस्थित झाल्या आहेत. पुन्हा एकदा एटीएमच्या, बँकेच्या रांगेत उभं राहावं लागेल का या प्रश्नाने सामान्यांना ग्रासलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर करण्यात येत असलेला हा दावा खोटा आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्युरोने (PIB) हा दावा फेटाळला आहे. सोशल मीडियावर करण्यात येत असलेला हा दावा खोटा असून RBI ने बँकांना 2000 च्या नोटांचा पुरवठा बंद केलेला नाही असंही म्हटलं आहे. या व्हायरल बातमीत असा दावा केला जात आहे की आरबीआयने सर्व बँकांना त्यांच्या एटीएममधून 2000 च्या नोटेचं कॅलिबर हटवायला सांगितलं आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने त्यांच्या 58 एटीएममधून 2 हजारच्या नोटेचं कॅलिबर हटवलं आहे, असंही या दाव्यात म्हटल आहे.
एक न्यूज़ आर्टिकल में दावा किया जा रहा है कि भारतीय रिजर्व बैंक ने 2000 रुपये के नोटों की आपूर्ति बंद कर दी है जिसके कारण एटीएम से केवल 100, 200 व 500 रूपए के नोट ही निकाले जा सकेंगे। #PIBFactcheck: यह दावा फर्जी है। @RBI ने ₹2000 के नोटों की आपूर्ति बन्द नहीं की है। pic.twitter.com/DzDMwXuRox
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 2, 2020
PIB फॅक्ट चेकने हा दावा सपशेल खोटा असल्याचं म्हटलं आहे. PIB फॅक्ट चेकने स्पष्ट केलं आहे की, आरबीआय देशातील विविध बँकांना 2 हजारांच्या नोटांचा सप्लाय करत आहे. याशिवाय देशातील कोणत्याही बँकेने त्यांच्या एटीएममधून 2 हजाराच्या नोटेचा कॅलिबर हटवला नाही आहे. (हे वाचा- HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! RBI ने थांबवल्या बँकेच्या डिजिटल सेवा ) पीआयबी फॅक्ट चेक काय काम करते? PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता