मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बंद होणार BSNL-MTNL? या कंपन्यांबाबत काय आहे सरकारचा प्लॅन

बंद होणार BSNL-MTNL? या कंपन्यांबाबत काय आहे सरकारचा प्लॅन

भारत संचार निगम लिमिडेट (Bharat Sanchar Nigam Limited) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (Mahanagar Telephone Nigam Limited) चे दीर्घकाळापासून मोठे नुकसान होत आहे.

भारत संचार निगम लिमिडेट (Bharat Sanchar Nigam Limited) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (Mahanagar Telephone Nigam Limited) चे दीर्घकाळापासून मोठे नुकसान होत आहे.

भारत संचार निगम लिमिडेट (Bharat Sanchar Nigam Limited) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (Mahanagar Telephone Nigam Limited) चे दीर्घकाळापासून मोठे नुकसान होत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: भारत संचार निगम लिमिडेट (Bharat Sanchar Nigam Limited) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (Mahanagar Telephone Nigam Limited) या कंपन्यांचे दीर्घकाळापासून मोठे नुकसान होत आहे. ज्यामुळे काही कामगार संघटनांनी सरकारवर असा आरोप केला होता की, सरकार या कंपन्या विकण्याचा विचार करत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी देखील सरकारला लक्ष्य केलं होतं.

दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये (Budget 2021) सरकारने एयर इंडिया, भारत पेट्रोलियमसह अनेक कंपन्यांमधील भागीदारी विकण्याची योजना आखली आहे. त्यामुळे अनेकांनी असा तर्क काढला आहे की BSNL आणि MTNL च्या दीर्घकाळ होणाऱ्या नुकसानामुळे या कंपन्या देखील विकण्याची योजना सरकार आखत आहे.

सरकारची अशी कोणतीही योजना नाही

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार संसदेत दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांनी सरकारच्या वतीने स्पष्ट केले की, सध्या बीएसएनएल आणि एमटीएनएलची विक्री करण्याची किंवा या कंपन्या बंद करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही.

(हे वाचा-पेट्रोल-डिझलेच्या किंमतीत आज पुन्हा वाढ, वर्षभरात 14 रुपयांनी महागलं इंधन)

या दोन कंपन्यांचे किती नुकसान झाले आहे?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात धोत्रे यांनी आकडेवारी सादर केली आणि सांगितले की 2019-20 मध्ये बीएसएनएलच्या तोट्यामध्ये वाढ झाली आहे. कंपनीचे नुकसान आता 15500 कोटींच्या जवळपास झाले आहे. याशिवाय एमटीएनएलचे सुमारे 3811 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

(हे वाचा-'सबका साथ सबका विकास' योजनेअंतर्गत मोदी सरकार खात्यात पाठवणार 1 लाख? वाचा सत्य)

लोकसभेत दिली माहिती

संजय धोत्रे यांनी बीएसएनएल आणि एमटीएनएल बाबत लोकसभेमध्ये लिखित स्वरुपात याबाबत उत्तर दिले आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की बीएसएनएलच्या 78569 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती (VRS)घेतली आहे. याशिवाय MTNL मध्ये 14387 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. याशिवाय सरकारने या कंपन्यांच्या मदतीसाठी 16206 कोटी रुपयांची घोषणा केली होती, त्यापैकी 14890 कोटी रुपये कंपन्यांना देण्यात आले आहेत.

First published:

Tags: BSNL, Telecom, Telecom companies