Diesel-Petrol Price Today: पेट्रोल-डिझलेच्या किंमतीत आज पुन्हा वाढ, वर्षभरात जवळपास 14 रुपयांनी महागलं इंधन

Diesel-Petrol Price Today: पेट्रोल-डिझलेच्या किंमतीत आज पुन्हा वाढ, वर्षभरात जवळपास 14 रुपयांनी महागलं इंधन

Diesel-Petrol Price Today: बजेटनंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत साधारण 14 रुपयांची वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका आठवड्यानंतर सरकारी कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधनाचे दर (Petrol Diesel Price on Thursday) गुरुवारी वाढवले आहेत. जर गेल्या एका वर्षाचा आढावा घेतला तर पेट्रोलचे दर 13.55 रुपयांनी वाढले आहेत. 02 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 73.10 रुपये प्रति लीटर होते, तर डिझेलचे दर 66.14 73.10 रुपये प्रति लीटर होते. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 86.65 73.10 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 76.83 73.10 रुपये प्रति लीटर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 93.20 रुपये प्रति लीटर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर गेले अनेक दिवस नव्वदीपार आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी एक फेब्रुवारी रोजी 2021-22 चे सर्वसाधारण बजेट सादर केले. त्यांनी पेट्रोलवर प्रति लीटर 2.5 रुपये आणि डिझेलवर 4 रुपये प्रति लीटर सेस वाढवण्याची घोषणा केली होती.

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

महानगरांमधील पेट्रोलचे दर

-दिल्ली: पेट्रोल 86.65 रुपये आणि डिझेल 76.83 रुपये प्रति लीटर

-मुंबई: पेट्रोल 93.20 रुपये आणि डिझेल 83.73 रुपये प्रति लीटर

-कोलकाता: पेट्रोल 88.01 रुपये आणि डिझेल 80.41 रुपये प्रति लीटर

-चेन्नई:  पेट्रोल 89.13 रुपये आणि डिझेल 82.04 रुपये प्रति लीटर

(हे वाचा-LIC ची खास पॉलिसी, दररोज 121 रुपये जमा करून मुलीच्या लग्नासाठी मिळतील 27 लाख)

-नोएडा: पेट्रोल 85.91 रुपये आणि डिझेल 77.24 रुपये प्रति लीटर

-बंगळुरू: पेट्रोल 89.54 रुपये आणि डिझेल 81.44 रुपये प्रति लीटर

-गुरुग्राम: पेट्रोल 84.72 रुपये आणि डिझेल 77.39 रुपये प्रति लीटर

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

(हे वाचा-LPG Price: ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती)

BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 4, 2021, 11:38 AM IST

ताज्या बातम्या