मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'सबका साथ सबका विकास' योजनेअंतर्गत मोदी सरकार खात्यात पाठवणार 1 लाख रुपये? वाचा सत्य

'सबका साथ सबका विकास' योजनेअंतर्गत मोदी सरकार खात्यात पाठवणार 1 लाख रुपये? वाचा सत्य

केंद्र सरकार  (Cental governement) कडून गरीब, शेतकरी आणि ज्यांना गरज आहे अशा अनेकांसाठी विविध योजना राबवते आहे. दरम्यान काही योजनांअंतर्गत नागरिकांच्या खात्यामध्ये देखील पैसे पाठवले जातात.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: केंद्र सरकार  (Cental governement) कडून गरीब, शेतकरी आणि ज्यांना गरज आहे अशा अनेकांसाठी विविध योजना राबवते आहे. दरम्यान काही योजनांअंतर्गत नागरिकांच्या खात्यामध्ये देखील पैसे पाठवले जातात. दरम्यान काही दिवसांपासून WhatApp वर एका मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की मोदी सरकार (Modi Government) सबका साथ सबका विकास योजना (sabka saath sabka vikas scheme)या योजनेअंतर्गत सर्व लोकांच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये ट्रान्सफर करत आहे. जाणून घ्या या बातमीमध्ये किती सत्यता आहे ते.

PIB ने केलं ट्वीट

भारत सरकारची संस्था असणाऱ्या पीआयबीने या व्हायरल मेसेजमागील सत्यता पडताळून पाहिली आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. पीआयबीने या मेसेजमध्ये करण्यात आलेले सर्व दावे फेटाळले आहेत.  हा दावा खोटा असल्याचे PIB ने म्हटले आहे. सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नसल्याचं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे.

(हे वाचा-ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी पर्याय द्या, विधानसभा अध्यक्षांची सूचना)

जो मेसेज WhatsApp वर व्हायरल होत आहे त्यामध्ये एक मोबाइल क्रमांक देखील आहे- 7682008789. Truecaller मोबाइल अॅपवर हा क्रमांक पडताळून पाहिला असता त्यावर नरसिंह रंधारी हे नाव दिसत आहे. या App च्या मते हा क्रमांक ओडिसामधील आहे.

तुम्हाला अशाप्रकारे कोणता मेसेज आल्यास कसं कराल फॅक्ट चेक?

तुम्ही पीआयबीच्या https://factcheck.pib.gov.in/ याठिकाणी जाऊन फॅक्टचेक करू शकता. त्याचप्रमाणे +918799711259 या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून किंवा pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करून तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. ही सर्व माहिती पीआयबीची अधिकृत वेबसाइट https://pib.gov.in  यावर देण्यात आली आहे.

(हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीचे भाव उतरले, खरेदी करण्यापूर्वी इथे तपासा नवे दर)

कोरोना काळात चुकीच्या बातम्या पसरण्याचा वेग वाढला

कोरोना काळात देशभरात मोठ्या प्रमाणात बनावट बातम्या व्हायरल होत आहेत. भारत सरकारचे प्रेस इन्फर्मेशन ब्युरो याबाबत वेळोवेळी नागरिकांना अपडेट देत आहे. कोणती बातमी किंवा मेसेज बनावट आहे याची माहिती ते देतात.

First published:

Tags: PIB