मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market Update : पुढील आठवड्यात बाजाराची दिशा कशी असेल? 'हे' घटक ठरतील महत्त्वपूर्ण

Share Market Update : पुढील आठवड्यात बाजाराची दिशा कशी असेल? 'हे' घटक ठरतील महत्त्वपूर्ण

आयटी क्षेत्र (IT Sector) वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक (Sectorial Index) 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात घसरणीसह बंद झाले. परिणामी, BSE सेन्सेक्स 1,755 अंकांनी घसरून 57,012 अंकांवर बंद झाला आणि गेल्या आठवड्यात निफ्टी 17,000 च्या पातळीच्या खाली घसरला आणि 16,985.20 वर बंद झाला.

आयटी क्षेत्र (IT Sector) वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक (Sectorial Index) 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात घसरणीसह बंद झाले. परिणामी, BSE सेन्सेक्स 1,755 अंकांनी घसरून 57,012 अंकांवर बंद झाला आणि गेल्या आठवड्यात निफ्टी 17,000 च्या पातळीच्या खाली घसरला आणि 16,985.20 वर बंद झाला.

आयटी क्षेत्र (IT Sector) वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक (Sectorial Index) 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात घसरणीसह बंद झाले. परिणामी, BSE सेन्सेक्स 1,755 अंकांनी घसरून 57,012 अंकांवर बंद झाला आणि गेल्या आठवड्यात निफ्टी 17,000 च्या पातळीच्या खाली घसरला आणि 16,985.20 वर बंद झाला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 19 डिसेंबर : गेल्या आठवड्यात शेअर बाजार  (Share Market) लाल चिन्हात बंद झाला. यूएस फेडरल रिझव्‍‌र्हकडून (US federal Reserve) चलनविषयक धोरण कडक करण्याची चिन्हे आणि बँक ऑफ इंग्लंडकडून (Bank Of England) अचानक व्याजदरात झालेली वाढ, तसेच ओमिक्रॉन आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल सेलिंग (FII) सेलिंगमधील तेजी यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला.

आयटी क्षेत्र (IT Sector) वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक (Sectorial Index) 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात घसरणीसह बंद झाले. परिणामी, BSE सेन्सेक्स 1,755 अंकांनी घसरून 57,012 अंकांवर बंद झाला आणि गेल्या आठवड्यात निफ्टी 17,000 च्या पातळीच्या खाली घसरला आणि 16,985.20 वर बंद झाला. दिग्गजांव्यतिरिक्त, लघु आणि मध्यम शेअर्समध्येही गेल्या आठवड्यात दबाव दिसून आला. गेल्या आठवड्यात, साप्ताहिक आधारावर, बीएसई मिडकॅप 4.5 टक्के आणि स्मॉल कॅप 2.75 टक्के घसरणीसह बंद झाला.

बाजाराच्या पुढील वाटचालीबद्दल, तज्ञांचे म्हणणे आहे की कोणतेही मोठे देशांतर्गत ट्रिगर नसताना, बाजाराची नजर जागतिक संकेतांवर असेल. बाजारातील अस्थिरतेसह आणखी दबाव दिसून येतोय. प्राथमिक बाजारात हालचाल होईल. याचे कारण पुढील आठवड्यात अनेक नवीन शेअर लिस्ट होणार आहेत. येथे आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे घटक सांगत आहोत जे पुढील आठवड्यात बाजाराची स्थिती आणि दिशा ठरवतील.

1 जानेवारीपासून 'या' बँकेत 10 हजारांहून अधिक रक्कम जमा करण्यासाठी चार्ज लागणार, किती खर्च वाढणार?

Omicron मुळे चिंता वाढली

ओमिक्रॉन हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना विषाणूचा नवीन वेरिएंट ओमिक्रॉन भारतासह जगातील 89 देशांमध्ये पसरला आहे. भारतात आतापर्यंत 143 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ओमिक्रॉन ही अर्थव्यवस्था आणि बाजार या दोन्हींसाठी मोठा धोका आहे. पुढील आठवड्यात ओमिक्रॉनशी संबंधित बातम्यांवर बाजाराची नजर असेल. मात्र दिलासा देणारी बाब आहे की सर्व संशोधन अहवालांमध्ये असे आढळून आले आहे की जास्त संसर्ग असूनही, ओमिक्रॉन डेल्टा प्रकारापेक्षा कमी प्राणघातक आहे. हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणतात की पुढील काही आठवडे बाजार ओमिक्रोमनशी संबंधित बातम्यांवर लक्ष ठेवेल.

FII सेलिंग

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (Foreign institutional investors) सातत्याने होणारी विक्री हा बाजारासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. तथापि, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून खरेदी केल्याने बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 10,452 कोटी रुपयांची विक्री केली होती. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजाराला पाठिंबा देत 6,341 कोटी रुपयांची खरेदी केली.

रुपयाची कमजोरी

यूएस फेडरल रिझर्व्हकडून चलनविषयक धोरणे कडक करण्याचे संकेत, एफआयआयकडून सातत्याने होत असलेली विक्री, तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 76 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. विदेशी मुद्रा बाजार (Forex market) देखील Omicron संबंधित अपडेटवर लक्ष ठेवून असेल.

तेलाच्या किमती

कोरोनाशी संबंधित अनिश्चिततेमध्ये साप्ताहिक आधारावर कच्च्या तेलाच्या किमती 2 टक्क्यांनी घसरल्या आहेत. परंतु ते प्रति बॅरल 70 डॉलरच्या पातळीपेक्षा वरच्या श्रेणीत बांधलेले दिसते. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण ही भारतासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे. कारण भारत हा कच्च्या तेलाचा निव्वळ आयातदार देश आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भविष्यातही कच्च्या तेलाची आवक या क्षेत्रात पाहायला मिळेल.

Investment Tips: 29 रुपयांच्या स्टॉकमध्ये कमाईची संधी, तीन महिन्यात 45 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

शेअर लिस्टिंग

पुढील आठवड्यात MapmyIndia, Metro Brands, Medplus Health Services आणि Data Patterns शेअरची बाजारात लिस्टिंग होईल. पुढच्या आठवड्यात जवळपास दररोज एका कंपनीची लिस्टिंग होईल. रिअल इस्टेट डेव्हलपर श्रीराम प्रॉपर्टीजच्या इक्विटी शेअरची लिस्टिंग 20 डिसेंबर रोजी होणार आहे. राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली किरकोळ फुटवेअर कंपनी मेट्रो ब्रँडची लिस्टिंग 22 डिसेंबर रोजी होणार आहे. फार्मसी रिटेलर मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस 23 डिसेंबर रोजी लिस्ट केले जातील आणि डेटा पॅटर्न शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी लिस्ट केले जातील.

पुढील आठवड्यात IPO निघणार

पुढील आठवड्यात अनेक आयपीओ बाजारात येत आहेत. भारतातील सर्वात मोठी कॅश मॅनेजमेंट कंपनी CMS Info Systems चा IPO 21 डिसेंबर रोजी उघडेल आणि 23 डिसेंबर रोजी बंद होईल. त्याची किंमत 205 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनी या IPO च्या माध्यमातून 1100 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे. ज्यामध्ये प्रमोटर त्यांचे स्टेक विकतील. त्याचप्रमाणे, सुप्रिया लाइफसायन्सची (Supriya Lifescience) फार्मास्युटिकल कंपनीचा 700 कोटी रुपयांचा IPO 20 डिसेंबर रोजी बंद होणार आहे. ते आतापर्यंत 5.69 वेळा सबस्क्राईब झाला आहे.

खासगी नोकरी करत असाल तरी मिळेल पेन्शन, निवृत्तीनंतर पैशांची अडचण येणार नाही

टेक्निकल व्ह्यू

निफ्टीमध्ये डेली आणि वीकली दोन्ही चार्टवर मोठी मंदीची कँडल तयार होत आहे. निफ्टी 18 डिसेंबर रोजी 1.5 टक्क्यांनी घसरला, तर गेल्या आठवड्यात सुमारे 3 टक्क्यांनी घसरून 17,000 च्या पातळीच्या खाली आला. जे बाजारात मंदीचे सावट कायम राहण्याची चिन्हे आहेत बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भविष्यात आणखी कमजोरी दिसेल. नजीकच्या काळात, निफ्टीला 16,900 हा पहिला सपोर्ट असेल. आणि त्यानंतर पुढील सपोर्ट 16,782 वर असेल. जी 29 नोव्हेंबरची नीचांकी पातळीही आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी म्हणतात की डेली चार्टवर एक लांब बियरिश कँडल (A long bear candle) तयार झाली आहे. जो चढत्या ट्रेंड लाईनच्या जवळच्या सपोर्टच्या खाली देखील गेला आहे. बाजाराची ही कृती सूचित करते की आपण अल्पावधीत बाजारात कमजोरी पाहणार आहोत. आपण निफ्टीमध्ये आणखी पडझड पाहू शकतो आणि पुढील आठवड्यापर्यंत 16,750 पर्यंत जाऊ शकतो. तर वरच्या बाजूने, 17,180 च्या पातळीवर इमिडिएट रजिस्टन्स (Immidiate Resistance) आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market