मुंबई, 19 डिसेंबर : शेअर बाजार कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याची संधी आहे. शेअर बाजाराची चांगली ओळख असेल आणि संयम असेल तर जास्त पैसे सहज कमवता येतात. असाच एक स्टॉक आहे ज्यामध्ये पैसे गुंतवून कमी वेळेत चांगले परतावा मिळू शकतो. स्टॉक मार्केटचे दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अशा स्टॉकचा समावेश आहे ज्यामध्ये सध्या चांगली वाढ होत आहे. तो स्टॉक म्हणजे प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज (Prozone Intu Properties). हा असाच एक स्मॉलकॅप स्टॉक आहे जो गेल्या 6 महिन्यांत 30 टक्क्यांनी वाढला आहे पण आता त्यात तेजी दिसत आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा
प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज शेअर राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 31.50 लाख शेअर किंवा 2.06 टक्के हिस्सा होता. गेल्या एका महिन्यात प्रोझोन इंटू प्रॉपर्टीजच्या स्टॉकमध्ये सुमारे 7.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या स्टॉकला बाउन्सबॅक दिसू शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
`या` मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 1 लाख बनले 91 लाख!
उत्तम परताव्याची अपेक्षा
तज्ञांचे म्हणणे आहे की कमी किमतीच्या स्टॉकमध्ये पुढील 3 महिन्यांत मजबूत वाढ अपेक्षित आहे. येत्या 2-3 महिन्यांत हा शेअर 42 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या हा शेअर 29 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया सांगतात की, प्रोझोन इंटू प्रॉपर्टीजचा स्टॉक 26 ते 30 रुपयांच्या दरम्यान फिरत आहे. असा अंदाज आहे की या स्टॉकमध्ये 32 रुपयांच्या आसपास ब्रेकआउट दिसून येईल आणि एकदा ही पातळी ओलांडली की तो 36 रुपये आणि नंतर 42 रुपयांपर्यंत जाईल.
टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असेल?
सध्याच्या पातळीवर या शेअरमध्ये खरेदी करता येईल. 3 महिन्यांसाठी 42 रुपयांच्या टार्गेटसाठी, त्यात 25 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे संतोष मीना सांगतात की, हा स्टॉक 24 रुपयांच्या आसपास बेस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या शेअरमध्ये 24 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवून अल्पावधीत 40-50 रुपयांचे टार्गेट ठेवून खरेदी करता येईल.
(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market