मुंबई, 19 डिसेंबर : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (India Post Payment Bank - IPPB) खातेधारकांना एका मर्यादेपासून रोख रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी शुल्क (Charges) भरावे लागणार आहे. हा नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये तीन प्रकारची बचत खाती उघडली जाऊ शकतात. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या मते, बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला चार वेळा पैसे काढता येतात. मात्र त्यानंतर प्रत्येक पैसे काढण्यासाठी किमान 25 रुपये द्यावे लागतील. मात्र बेसिंग बचत खात्यावर पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
Investment Tips: 29 रुपयांच्या स्टॉकमध्ये कमाईची संधी, तीन महिन्यात 45 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता
बचत खाते (Saving Account) आणि चालू खाते (Current Account)
बेसिक सेव्हिंग अकाउंट व्यतिरिक्त बचत आणि चालू खात्यांमध्ये एका महिन्यात 10,000 रुपये जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परंतु या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास किमान 25 रुपये शुल्क आकारले जाईल. बेसिक सेविंग अकाऊंटव्यतिरिक्त बचत खाते आणि चालू खात्यातून दरमहा 25000 रुपये काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र प्रत्येक वेळी आपण विनामूल्य मर्यादेनंतर पैसे काढता तेव्हा किमान 25 रुपये आकारले जातील.
`या` मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 1 लाख बनले 91 लाख!
IPPB वेबसाइटनुसार, हे सर्व नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. यात GST/CESS स्वतंत्रपणे लावला जाईल. याआधी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने 1 ऑगस्ट 2021 रोजी डोअरस्टेप बँकिंग चार्जेसचे नवीन दर लागू केले होते. यासाठी प्रति ग्राहक 20 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market