मराठी बातम्या /बातम्या /मनी /खासगी नोकरी करत असाल तरी मिळेल पेन्शन, निवृत्तीनंतर पैशांची अडचण येणार नाही

खासगी नोकरी करत असाल तरी मिळेल पेन्शन, निवृत्तीनंतर पैशांची अडचण येणार नाही

कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार

कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार

तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक NPS खात्यात पैसे जमा करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर 1,000 रुपयांमध्ये NPS खाते उघडू शकता. NPS खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते.

मुंबई, 19 डिसेंबर : निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन (Financial Planning) सुरुवातीपासूनच करायला हवे. निवृत्तीनंतर केवळ सरकारी नोकरांनाच पेन्शनचा लाभ मिळतो असे नाही, तुम्ही खासगी नोकरीत (Private Job) असाल किंवा कोणत्याही व्यवसायात असाल तर तुम्ही स्वत:साठीही निवृत्ती योजना (Pension Scheme) तयार करू शकता.

निवृत्तीचे नियोजन हा जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) सुरू केली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक प्रकारची पेन्शन तसेच गुंतवणूक योजना आहे. ही योजना बाजार आधारित परताव्याची हमी देते. NPS ही सरकारी गुंतवणूक योजना आहे. ही योजना 2004 मध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. 2009 पासून, ही योजना सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुली करण्यात आली.

सरकारी गुंतवणूक योजना

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही सरकारी गुंतवणूक योजना आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे त्याचे नियमन केले जाते. ही योजना सर्वप्रथम 2004 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु 2009 मध्ये ही योजना सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुली करण्यात आली. कोणतीही व्यक्ती नोकरीच्या काळात पेन्शन खाते उघडू शकते.

Investment Tips: 29 रुपयांच्या स्टॉकमध्ये कमाईची संधी, तीन महिन्यात 45 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

NPS मध्ये गुंतवणूक करण्याचे वय 18 ते 70 वर्षे आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्यात गुंतवणूक करू शकता. NPS ची खास गोष्ट म्हणजे तुम्ही निवृत्तीपूर्वीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत गुंतवलेल्या रकमेचा काही भाग तुम्ही निवृत्तीपूर्वी काढू शकता. तुम्ही निवृत्तीच्या वेळी एकूण ठेवीपैकी 60 टक्के रक्कम काढू शकता आणि उर्वरित 40 टक्के रक्कम पेन्शन योजनेत जाईल. या दरम्यान, जर तुम्हाला एनपीएस खाते बंद करायचे असेल, तर तुम्ही 3 वर्षांनंतर खाते बंद करू शकता.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक NPS खात्यात पैसे जमा करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर 1,000 रुपयांमध्ये NPS खाते उघडू शकता. NPS खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते.

दोन प्रकारचे खाते

नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत दोन प्रकारे खाती उघडली जाऊ शकतात. टियर-1 खात्यात जमा केलेले कोणतेही पैसे मुदतीपूर्वी काढता येत नाहीत. जेव्हा तुम्ही योजनेतून बाहेर असाल तेव्हाच तुम्ही पैसे काढू शकता.

टियर-2 खाते उघडण्यासाठी, तुम्ही टियर 1 खातेधारक असणे आवश्यक आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पैसे जमा किंवा काढू शकता. प्रत्येकाने हे खाते उघडणे बंधनकारक नाही.

1 जानेवारीपासून 'या' बँकेत 10 हजारांहून अधिक रक्कम जमा करण्यासाठी चार्ज लागणार, किती खर्च वाढणार?

राष्ट्रीय पेन्शन योजनेचे फायदे

>> निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल.

>> Annuity च्या खरेदीत गुंतवणुकीत करातून पूर्णपणे सूट दिली जाईल.

>>कलम 80CCE अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त सूटचा दावा केला जाऊ शकतो.

>>राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक मर्यादा 6000 रुपये आहे.

>> किमान गुंतवणूक न केल्यास, खाते गोठवले जाईल आणि 100 रुपये दंड आकारला जाईल.

>> जर गुंतवणुकदाराचा मृत्यू 60 वर्षापूर्वी झाला, तर नॉमिनीला पेन्शनची रक्कम दिली जाईल.

>> या योजनेत एकापेक्षा जास्त खाते उघडता येणार नाही.

First published:
top videos

    Tags: Open nps account, Pension