मराठी बातम्या /बातम्या /मनी /वंदे भारत ट्रेनमध्ये आता स्लीपर कोचही, या सुपरफास्ट ट्रेनचा वेग किती?

वंदे भारत ट्रेनमध्ये आता स्लीपर कोचही, या सुपरफास्ट ट्रेनचा वेग किती?

पुढील 2 वर्षात वंदे भारत एक्स्प्रेसच्या 400 गाड्या तयार केल्या जातील ज्यात 200 गाड्यांमध्ये बसण्याची सोय असेल तर उर्वरित 200 गाड्या स्लीपर कोचसह रुळावरुन धावतील.

पुढील 2 वर्षात वंदे भारत एक्स्प्रेसच्या 400 गाड्या तयार केल्या जातील ज्यात 200 गाड्यांमध्ये बसण्याची सोय असेल तर उर्वरित 200 गाड्या स्लीपर कोचसह रुळावरुन धावतील.

पुढील 2 वर्षात वंदे भारत एक्स्प्रेसच्या 400 गाड्या तयार केल्या जातील ज्यात 200 गाड्यांमध्ये बसण्याची सोय असेल तर उर्वरित 200 गाड्या स्लीपर कोचसह रुळावरुन धावतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 20 जानेवारी: भारतीय रेल्वेमध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत. रेल्वेच्या वंदे भारत गाड्या लोकांना खूप आवडत आहेत. आता भारतीय रेल्वेच्या प्रगतीची ओळख बनणाऱ्या वंदे भारत गाड्यांमध्ये एक नवीन सुविधा जोडली जाणार आहे. याद्वारे, कमी वेळेत आणि आरामदायी मार्गाने इच्छित स्थळी पोहोचणे शक्य आहे. आता रेल्वेने स्लीपर कोच असलेली वंदे भारत ट्रेन बनवण्याचे काम सुरू केले आहे, जेणेकरून मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांनाही या ट्रेन सेवेचा लाभ घेता येईल

स्लीपर कोच असलेल्या वंदे भारत ट्रेन देशात धावणार आहेत

देशाला एकसुत्रात जोडण्यासाठी रेल्वे अशा 200 वंदे भारत ट्रेन बनवत आहे, ज्यात स्लीपर कोचचीही सुविधा असेल. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेधा आणि आयसीएफ चेन्नई या खासगी कंपन्यांना वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर क्लाससह बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. या महिन्याच्या अखेरीस यासाठीची टेंडर प्रक्रिया फायनल होईल. 2025 च्या अखेरीस 278 वंदे भारत गाड्या रुळांवर धावू लागतील अशी आशा आहे.

रेल्वेने नियमित प्रवास करता तर 'ही' माहिती असायलाच हवी... 

किती असेल वेग?

रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर व्हर्जन जास्तीत जास्त 220 किमी प्रतितास वेगाने प्रवास करण्यासाठी डिझाइन केली जाईल. मात्र, अ‍ॅल्युमिनियमपासून बनलेली ही स्लीपर ट्रेन रुळांवर ताशी 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे.

'21 वर्षे काम केलं अन्....', नोकरी गेल्यानंतर Microsoft च्या कर्मचाऱ्याचे भावुक पत्र 

15 ऑगस्टपर्यंत 78 गाड्या तयार करण्याचे लक्ष्य

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत मालिकेच्या पहिल्या टप्प्यात 78 गाड्या बनवण्याचे काम सुरू आहे. या सर्व गाड्या कमी अंतराच्या आहेत, ज्यात चेअर कार आहेत. सध्या अशा 8 गाड्या (वंदे भारत एक्सप्रेस) कार्यान्वित झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 75 वंदे भारत ट्रेन धावायला सुरुवात करतील. ही अखेरची मुदत जवळ येत आहे, त्यामुळे दोन्ही कंपन्या वेगाने हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. ट्रेन तयार करण्याचे काम सुरु आहे. यातील 8 गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

लोकांचा प्रवासाचा अनुभव बदलेल

अशा चेअर कार असलेल्या 78 गाड्या चालवल्यानंतर स्लीपर कोच असलेल्या 200 वंदे भारत स्लीपर कोच गाड्यांचे बांधकाम सुरू होईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, 2025 च्या अखेरीस 278 वंदे भारत ट्रेन रुळांवर धावणार आहेत. त्याचवेळी, 2027 पर्यंत देशात 478 वंदे भारत गाड्या प्रवाशांना सुविधा देत असतीलयामध्ये स्लीपर आणि चेअर कार अशा दोन्ही गाड्या असतील.

First published:

Tags: Business, Business News, Indian railway, Train