मराठी बातम्या /बातम्या /मनी /IPO News: 15 नोव्हेंबरला आहे जबरदस्त कमाईची संधी, येतोय आणखी एका कंपनीचा आयपीओ

IPO News: 15 नोव्हेंबरला आहे जबरदस्त कमाईची संधी, येतोय आणखी एका कंपनीचा आयपीओ

Upcoming IPO: आरोग्य संशोधनाशी संबंधित टारसन्स प्रोडक्ट्स (Tarsons Products IPO) आयपीओ देखील बाजारात येत आहे. काहीच दिवसात अर्थात 15 नोव्हेंबर रोजी तुम्हाला ही खरेदी करता येणार आहे.

Upcoming IPO: आरोग्य संशोधनाशी संबंधित टारसन्स प्रोडक्ट्स (Tarsons Products IPO) आयपीओ देखील बाजारात येत आहे. काहीच दिवसात अर्थात 15 नोव्हेंबर रोजी तुम्हाला ही खरेदी करता येणार आहे.

Upcoming IPO: आरोग्य संशोधनाशी संबंधित टारसन्स प्रोडक्ट्स (Tarsons Products IPO) आयपीओ देखील बाजारात येत आहे. काहीच दिवसात अर्थात 15 नोव्हेंबर रोजी तुम्हाला ही खरेदी करता येणार आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून आयपीओ मार्केटमध्ये (New IPO in Market) विशेष तेजी पाहायला मिळते आहे. नवनवीन आयपीओ बाजारात दाखल होत असल्याने गुंतवणूकदारांसाठी कमाईच्या संधी (Earning Money Idea) देखील वाढत आहेत. अनेक दिग्गज कंपन्यांच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवून गुंतवणूकदार मालामाल (Upcoming IPO List) झाले आहेत. दरम्यान आरोग्य संशोधनाशी संबंधित टारसन्स प्रोडक्ट्स (Tarsons Products IPO) आयपीओ देखील बाजारात येत आहे. काहीच दिवसात अर्थात 15 नोव्हेंबर रोजी तुम्हाला ही खरेदी करता येणार आहे. बाजार नियामकाकडून मिळालेल्या मंजूरीनुसार कंपनी या आयपीओअंतर्गत तीन दिवस शेअर्सची विक्री करणार आहे. हा इश्यू 17 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे.

या आयपीओदरम्यान विक्रीसाठी 150 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स सादर केले जाणार आहेत. याशिवाय प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांकडे असणारे 1.32 कोटी इक्लिटी शेअर्स देखील सादर केले जाणार आहेत. प्रमोटर संजीव सहगल त्यांचे 3.9 लाख शेअर्स आणि रोहन सहगल 3.1 लाख शेअर्सची विक्री करतील. तर गुंतवणूक फर्म क्लिअर व्हिजन इनव्हेस्टमेंट होल्डिंग्ज 1.25 शेअर्सची विक्री करतील.

हे वाचा-Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील शेअरमधून गुंतवणूकदार मालामाल

जाणून घ्या कंपनीविषयी..

ही कंपनी प्रयोगशाळेतील उपकरणांची निर्मिती करते. ज्याद्वारे प्रगत वैज्ञानिक संशोधन आणि आरोग्य सेवा सुधारण्यास मदत केली जात आहे. सध्या या कंपनीचे पश्चिम बंगालमध्ये पाच प्लांट आहेत. या पब्लिक इश्यूमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठीही आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या IPO मधून मिळणारी रक्कम कर्ज फेडण्यासाठी त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील पंचला याठिकाणी नवीन उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी वापरली जाईल.

Paytm IPO

गेल्या काही दिवसांपासून Paytm IPO ची जोरदार चर्चा सुरु होती. आज अखेर Paytm IPO मध्ये गुंतवणूकदार अप्लाय करता येत आहे. पेटीएमचा आयपीओ आजवरचा सर्वात मोठा IPO आहे. त्यानुसार पेटीएमच्या आयपीओची ओपनिंगही जोरदार झाली आहे. 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ग्राहक आपल्या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून हा आयपीओ खरेदी करू शकतात.

हे वाचा-TATA Motors चा बँक ऑफ इंडियासोबत वाहन फायनान्स करार, ग्राहकांना मिळणार सुविधा

दरम्यान पेटीएम आयपीओ संदर्भात मार्केट तज्ज्ञांची मतं विभिन्न आहेत. पेटीएमच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणे जोखीमपूर्ण ठरू शकते आणि अशी देखील शक्यता आहे की स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंगवेळी यामध्ये विशेष लाभ मिळणार नाही. याबाबत माहिती एल्डर कॅपिटल (Alder Capital) चे इनव्हेस्टमेंट मॅनेजर राखी प्रसाद (Rakhi Prasad) यांनी ब्लूमबर्गशी बोलताना दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Savings and investments, Share market