मराठी बातम्या /बातम्या /मनी /TATA Motors चा बँक ऑफ इंडियासोबत वाहन फायनान्स करार, ग्राहकांना मिळणार विशेष सुविधा

TATA Motors चा बँक ऑफ इंडियासोबत वाहन फायनान्स करार, ग्राहकांना मिळणार विशेष सुविधा

 टाटा मोटर्सच्या (Tata Motors) कार खरेदीदारांना 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरमध्ये कोणतेही प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.

टाटा मोटर्सच्या (Tata Motors) कार खरेदीदारांना 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरमध्ये कोणतेही प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.

टाटा मोटर्सच्या (Tata Motors) कार खरेदीदारांना 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरमध्ये कोणतेही प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.

मुंबई, 9 नोव्हेंबर : टाटा मोटर्सने (Tata Motors) बँक ऑफ इंडियासोबत (Bank Of India) रिटेल फायनान्स सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत कंपनीच्या सर्व प्रवासी वाहन ग्राहकांना वाहन वित्तपुरवठा (Vehicle Finance) सुविधेचा पर्याय असेल. या करारानुसार, बँक ऑफ इंडिया टाटा मोटर्सच्या ग्राहकांना 6.85 टक्के पर्यंत कमी व्याजदराने वाहन कर्ज देईल.

या सुविधेअंतर्गत वाहनाच्या मूल्याच्या जास्तीत जास्त 90 टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा सुविधा उपलब्ध असेल. यामध्ये एक्स-शोरूम किंमत तसेच विमा आणि नोंदणीचा ​​खर्च समाविष्ट असेल. यासोबतच त्यावर ईएमआय सुविधाही मिळणार आहे. या अंतर्गत 7 वर्षांच्या कालावधीत 1502 रुपये प्रति लाख या दराने हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड केली जाऊ शकते.

विविध प्रकारच्या सवलती

यापूर्वी टाटा मोटर्सने लहान व्यावसायिक वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी Equitas SFB सोबत असाच करार केला होता. ऑफर देशभरातील नवीन ICE कार, SUV आणि पर्सनल सेगमेंटच्या इलेक्ट्रिक वाहनांवर लागू होईल. टाटा मोटर्सच्या कार खरेदीदारांना 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरमध्ये कोणतेही प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.

Business Idea :'या' व्यवसायातून दररोज मिळू शकतं 4 ते 5 हजार रुपये उत्पन्न

टाटा EV स्पेसमध्ये झपाट्याने वाढ

कंपनीने नुकतेच त्यांचे निकाल जाहीर केले होते. त्यानुसार या तिमाहीत कंपनीला 4,415.5 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा 307.3 कोटी रुपये होता. तर दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 61378.8 कोटी रुपये होते. जे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 53530 कोटी रुपये होते. सध्या, हा स्टॉक NSE वर 13.40 (2.67%) रुपयांच्या वाढीसह 515.40 च्या पातळीवर दिसत आहे.

टाटा मोटर्सची मार्केटवर पकड कायम

टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या माध्यमातून बाजारात आपली पकड मजबूत करणे सुरूच ठेवले आहे. एकेकाळी व्यावसायिक कार बनवणारी कंपनी मानली जाणारी टाटा मोटर्स आता सर्वात सुरक्षित वाहनांसाठी ओळखली जाते. फीचर्सच्या बाबतीत टाटाची वाहनेही मागे नाहीत. यामुळेच TATA Tigor ते Tata Nexon आणि अगदी अलीकडच्या TATA Punch पर्यंत कंपनीचे सर्व मॉडेल्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

Multibagger Stock : 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांचे 10,000 चे केले एक कोटी! तज्ज्ञांच्या मते अजूनही कमाईची संधी

रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत प्रति कार 45,810 रुपये नफा कमावला आहे. याच कालावधीतील मारुती सुझुकीच्या तुलनेत हे जवळपास दुप्पट आहे. 10 वर्षात पहिल्यांदाच टाटा मोटर्सने प्रति कार नफ्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपनीला मागे टाकलं आहे. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे मार्जिन FY22 च्या दुसऱ्या तिमाहीत 5.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्याच वेळी, मारुतीसाठी हे मार्जिन 4.2 टक्क्यांवर घसरले.

First published:

Tags: Tata group, बँक