मराठी बातम्या /बातम्या /मनी /Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील शेअरमधून गुंतवणूकदार मालामाल, अजूनही तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील शेअरमधून गुंतवणूकदार मालामाल, अजूनही तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

देशात कोरोना केसेस (Coronavirus cases) कमी होत आहेत, याचा फायदा डेल्टा कॉर्पला होत आहे. नवीन रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे हॉस्पिटॅलिटी आणि कसिनो (Hospitality And Casino Business) व्यवसायाला फायदा झाला आहे.

देशात कोरोना केसेस (Coronavirus cases) कमी होत आहेत, याचा फायदा डेल्टा कॉर्पला होत आहे. नवीन रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे हॉस्पिटॅलिटी आणि कसिनो (Hospitality And Casino Business) व्यवसायाला फायदा झाला आहे.

देशात कोरोना केसेस (Coronavirus cases) कमी होत आहेत, याचा फायदा डेल्टा कॉर्पला होत आहे. नवीन रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे हॉस्पिटॅलिटी आणि कसिनो (Hospitality And Casino Business) व्यवसायाला फायदा झाला आहे.

मुंबई, 9 नोव्हेंबर : राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील (Rakesh Jhunjhunwala's Portfolio) एका शेअरने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. कसिनो कंपनी Delta Corp चे शेअर्सनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिले आहे. Delta Corp चे शेअर्स वर्षभरात 147 रुपयांवरून 288.4 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

गेल्या एका वर्षाबद्दल बोलायचे तर डेल्टा कॉर्पच्या शेअर्सनी 150 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहे. स्टॉक मार्केटमधील तज्ज्ञ डेल्टा कॉर्पच्या शेअर आणखी वधारेल असा अंदाज लावत आहेत. डेल्टा कॉर्पचे शेअरचे Fundamental आणि Technical पाहिले तर शेअर मजबूत दिसत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

देशात कोरोना केसेस (Coronavirus cases) कमी होत आहेत, याचा फायदा डेल्टा कॉर्पला होत आहे. नवीन रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे हॉस्पिटॅलिटी आणि कसिनो (Hospitality And Casino Business) व्यवसायाला फायदा झाला आहे. पुढे ख्रिसमस आणि नवीन वर्षामुळे (News Year) हॉटेल्स आणि कॅसिनोचा व्यवसाय आणखी वाढणार आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून, डेल्टा कॉर्पच्या शेअरचे टार्गेट 305 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

Business Idea :'या' व्यवसायातून दररोज मिळू शकतं 4 ते 5 हजार रुपये उत्पन्न

Delta Corp वर भाष्य करताना, चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया म्हणाले की, डेल्टा कॉर्पचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर मजबूत दिसत आहेत. शॉर्ट टर्मसाठी डेल्टा कॉर्प शेअर्सचे टार्गेट 310-325 रुपये आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यामध्ये गुंतवणूक केली तर टार्गेट 310-325 आहे. जर कुणाला या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असल्यास सध्याच्या मार्केट प्राईजवर शेअर खरेदी करू शकता येईल, तर स्टॉप लॉस 270 रुपये असेल.

सुमीत बगडिया यांनी सांगितले की डेल्टा कॉर्पचे नवीन ब्रेकआउट 305 रुपये असू शकतो. या स्टॉकमध्ये असलेल्या तेजीबद्दल, GCL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल म्हणाले की, डेल्टा कॉर्प ही हॉस्पिटॅलिटी आणि ऑनलाइन गेमिंग कंपनी आहे.

Multibagger Stock : 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांचे 10,000 चे केले एक कोटी! तज्ज्ञांच्या मते अजूनही कमाईची संधी

कंपनीचा मोठा भाग कॅसिनो व्यवसायातही गुंतलेला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढेल. सध्या गुंतवणूकदार 275-285 च्या रेंजमध्ये शेअर खरेदी करू शकतात. याचे टार्गेट जानेवारी 2022 पर्यंत 350 रुपये आहे. तर 250 रुपये स्टॉप लॉस ठेवण्यास विसरू नका, असं रवी सिंघल म्हणाले. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्याकडे सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत डेल्टा कॉर्पमध्ये 7.50 टक्के हिस्सा आहे.

(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market