नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर: गेल्या काही महिन्यांपासून मार्केटमध्ये (Share Market News Update) असंख्य आयपीओ बाजारात आले आहेत. दरम्यान तुम्ही आतापर्यंत कोणत्याच IPO मध्ये गुंतवणूक केली नसेल तरी काळजीचं कारण नाही. कारण आणखीही काही आयपीओना (Upcoming IPO List) सेबीची (SEBI approved Adani Wilmar IPO) मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच हे आयपीओ बाजारात उपलब्ध होतील आणि तुम्हाला गुंतवणुकीची संधी मिळेल.
आता दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautan Adani Networth) यांच्या नेतृत्वाखालील अदानी ग्रुपची कंपनी (Adani Group) अदानी विल्मर (Adani Wilmar IPO) देखील आयपीओ आणणार आहे. सीएनबीसी टीव्ही -18 मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील बाजार नियामक सेबीने अदानी विल्मरच्या आयपीओ अर्जाला मान्यता दिली आहे. एफएमसीजी कंपनी अदानी विल्मरचा या आयपीओच्या नवीन इश्यूद्वारे 4500 कोटी रुपयांचा फंड उभारण्याचा मानस आहे.
अदानी विल्मर खाद्यतेल ब्रँड फॉर्च्यून (Fortune Oil Brand) तयार करते. ही कंपनी अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायजेस आणि Asian agri business Wilmar International यांनी संयुक्तपणे स्थापन केलेली कंपनी आहे.
वाचा-Hurun Rich List 2021: 102 रुपयांचा शेअर पोहोचला ₹3200 वर, या तरुण उद्योजकाची कमाल
स्टार हेल्थ इन्शुरन्सलाही सेबीकडून मंजुरी
सेबीने भारतातील सर्वात मोठी खाजगी आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ इन्शुरन्सला (Star Health Insurance IPO) आयपीओ आणण्यास मान्यता दिली आहे. हेल्थ इन्शुरन्स बाजारात स्टार हेल्थचा वाटा सुमारे 15.8 टक्के आहे. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांची देखील स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये भागीदारी आहे.
वाचा-Aadhaar Card असेल तर काही Clicks वर मिळेल कर्ज, वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय?
स्टार हेल्थ इन्शुरन्स आपल्या प्रस्तावित आयपीओद्वारे 5,500 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या आयपीओ इश्यूमध्ये 2000 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असेल तर 6,01,04,677 इक्विटी शेअर्ससाठी ऑफर फॉर सेल असेल. या ऑफर फॉर सेलद्वारे, कंपनीचे प्रमोटर्स आणि विद्यमान भागधारक त्यांचे भागभांडवल विकतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Savings and investments, Share market