मराठी बातम्या /बातम्या /मनी /Aadhaar Card असेल तर काही Clicks वर मिळेल कर्ज, वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय?

Aadhaar Card असेल तर काही Clicks वर मिळेल कर्ज, वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय?

 जर तुम्हाला कर्ज घेऊन काही महत्वाचे काम करायचे असेल तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आजच्या काळात कर्ज घेणे  (How to get a Personal Loan) पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे

जर तुम्हाला कर्ज घेऊन काही महत्वाचे काम करायचे असेल तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आजच्या काळात कर्ज घेणे (How to get a Personal Loan) पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे

जर तुम्हाला कर्ज घेऊन काही महत्वाचे काम करायचे असेल तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आजच्या काळात कर्ज घेणे (How to get a Personal Loan) पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर: जर तुम्हाला कर्ज घेऊन काही महत्वाचे काम करायचे असेल तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आजच्या काळात कर्ज घेणे  (How to get a Personal Loan) पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. जर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर तुम्हाला आता जास्त कागदी कामाची गरज भासणार नाही. तुम्हाला केवायसी कागदपत्रे (KYC Documents for Loan Procedure) बँकेत जमा करावी लागतील आणि त्यामुळे बँकेला सर्व तपशील मिळतील. तुम्ही आधार कार्डद्वारे (Personal Loan through Aadhaar) वैयक्तिक कर्जासाठी अर्ज देखील करू शकता.

आधार कार्डच्या मदतीने मिळवा Instant Loan

आधार कार्डच्या मदतीने तुम्ही झटपट वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. ज्यासाठी तुम्ही घरी बसून ऑनलाईन (How to apply for loan) अर्ज करू शकता. याकरता तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल आणि ई-केवायसी दस्तावेज द्यावे लागतील तुम्हाला कोणत्याही दस्तावेजाची हार्ड कॉपी सबमिट करण्याची आवश्यकता नाही. आधारच्या साहाय्याने तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर सर्वप्रथम हे सुनिश्चित करावे लागेल की तुमच्या आधार कार्डावरील सर्व तपशील योग्य आहे ना. माहिती योग्य असल्यास तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अप्लाय करू शकता.

नोकरी करतानाच सुरू करा हा व्यवसाय, 1 लाखापर्यंत मिळेल नफा; किती कराल गुंतवणूक?

आधारद्वारे कसं मिळवाल कर्ज?

>> यासाठी आधी तुम्हाला तुमच्या बँकेच्या मोबाईल अॅप किंवा वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

>> येथे तुम्हाला कर्जाचा पर्याय मिळेल. तुम्हाला पर्सनल लोनचा पर्याय निवडावा लागेल आणि त्यावर क्लिक करून पात्रता तपासावी लागेल. त्यानंतर Apply Now वर क्लिक करा.

>> अर्ज भरून, तुम्हाला तुमचे वैयक्तिक तपशील तसंच रोजगार तपशील भरावा लागेल.

>> यात तुम्हाला आधार कार्डची कॉपी अपलोड करावी लागेल.

>> तुम्हाला बँकेकडून एक कॉल येईल जो तुमचा तपशील आणि पात्रता पडताळेल. पडताळणीनंतर तुमचे कर्ज मंजूर होईल.

>> कर्ज पास झाल्यानंतर कर्जाचे पैसे तुमच्या खात्यात बचत खात्यात येतील.

5 रुपयांचा हा शेअर पोहोचला ₹233 वर, 1 लाखाचे कमावले 42.30 लाख

काय आहेत नियम आणि अटी?

ही सुविधा मिळवण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 23 ते जास्तीत जास्त 60 असावे लागेल. तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे सार्वजनिक, खाजगी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी असणे आवश्यक आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर योग्य असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे किमान उत्पन्न दाखवावे लागेल.

First published:

Tags: Aadhar card, Home Loan, Instant loans, Loan, Pay the loan