मराठी बातम्या /बातम्या /मनी /Union Budget 2023 : कोरोनाचा फटका बसलेला स्टार्टअप उद्योग कशी भरारी घेणार? Video

Union Budget 2023 : कोरोनाचा फटका बसलेला स्टार्टअप उद्योग कशी भरारी घेणार? Video

X
Union

Union Budget 2023 : कोरोना कालखंडात स्टार्टअप उद्योगांना मोठा फटका बसला. या उद्योगांना 'अच्छे दिन' येण्यासाठी आगामी बजेटमध्ये काय केलं पाहिजे?

Union Budget 2023 : कोरोना कालखंडात स्टार्टअप उद्योगांना मोठा फटका बसला. या उद्योगांना 'अच्छे दिन' येण्यासाठी आगामी बजेटमध्ये काय केलं पाहिजे?

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Pune, India

  पुणे, 30 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीपासूनच 'मेक इन इंडिया' ची घोषणा करत स्वदेशी उद्योगांना बळ दिलंय देशामध्ये स्टार्टअप उद्योग सुरू व्हावेत, भारत आत्मनिर्भर व्हावा यासाठी अनेक सरकारी योजना तयार करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारच्या बजेटमध्येही त्याचं प्रतिबिंब दिसतं. आगामी आर्थिक बजेटमध्ये या स्टार्टअप इंडस्ट्रीला काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

  आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनेक स्टार्टअप्स गेल्या काही वर्षांमध्ये उदयाला आले आहेत. आयसीएआय संघटनेच्या उपाध्यक्ष रुता चितळे यांनी नव्या स्टार्टअपबाबत बजेटमधील अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. 'नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये टीडीएस आणि जीएसटीमुळे खेळत्या भांडवलात कमतरता जाणवते. आगामी बजेटमध्ये सरकारनं त्यांना टीडीएस, जीएसटी तीन किंवा सहा महिन्यांनी भरण्याची सवलत द्यावी. त्यामुळे त्यांचे भांडवल लवचिक राहील.

  त्याचबरोबर नव्या स्टार्टअप उद्योगांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सवलती मिळाव्यात. या उद्योगांची आयकरामधील सूट मिळवण्याची प्रोसेस लवकर सुरू करावी, अशी मागणीही चितळे यांनी केली.

  Union Budget 2023 : बजेटनंतर सोन्याचे भाव कमी होणार की वाढणार? पाहा Video

  कोरोनातील नुकसानभरपाई

  कोरोना कालखंडात स्टार्टअप उद्योगांना खीळ बसली होती. त्यांचे हे नुकसान भरुन काढण्यासाठी त्यांना करमुक्तीचा वेळ जास्त मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 'स्टार्ट अप इंडिया' उपक्रमातून मिळणारे फंडिंग लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं असल्याचं चितळे यांनी स्पष्ट केले.

  मार्केटिंग करणे रिसर्चसाठी फंडिंग करणे या स्टार्टअप उद्योगासाठी महत्त्वाच्या गो्टी आहेत. या स्टार्टअपना गुंतवणूक करण्यासाठी अधिक सवलत मिळाली तर त्याचा या उद्योगांना फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

  First published:

  Tags: Budget 2023, Local18, Money, Pune, Startup