पुणे, 26 जानेवारी : सोने खरेदी हा सर्वसामान्य भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लग्नसमारंभात, अडचणीच्या वेळी विक्री करुन पैशांची उभारणी करण्यासाठी, मालमत्ता वाढीसाठी, स्त्रीधन म्हणून वेगवेगळ्या उद्देशासाठी सोन्याची खरेदी केली जाते. विशेषत: शुभ मुहूर्तावर तर सोने खरेदीचे नवे विक्रम देशभर होतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
आगामी बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री याबाबत काही घोषणा करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बजेटनंतर सोन्याचे भाव कमी होऊ शकतील का? याबाबत पुण्यातील सीआयएच्या उपाध्यक्ष रुता चितळे यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
सोन्याच्या भावावर काय परिणाम?
'देशात तेलाच्यानंतर सोन्याची आयात केली जाते. परकीय चलनाच्या आधारे ही खरेदी होते. सोन्यावरील 18 टक्के करापैकी साडेबारा टक्के आयात कर आहे. परकीय चलनाचा ताण सहन होईल तोपर्यंतच आयात कर कमी असतो. आपल्याकडे सोन्याचे दर कमी झाले तर लोकांची मागणी वाढेल, त्याचा ताण परकीय चलनावर येऊ शकतो,' असे चितळे यांनी स्पष्ट केलं.
80C ची मुदत संपली तर अजून कोणत्या मार्गाने तुमचा कर वाचवू शकता? Video
शेअर मार्केट कोसळल्यानंतर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते. सध्या शेअर मार्केटच्या वातावरणानुसार मार्केटमध्ये जोखीम जास्त आहे. त्यामुळे सोनं खरेदीकडे लोकांचा अधिक कल आहे. सोन्याचा दर कमी झाला तर त्याला मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आणि मागणीनुसार पुरवठा या तत्त्वानुसार सोन्याचे दर जरी कमी झाले तरी तेवढे सोने उपलब्ध होईल का हा मोठा प्रश्न आहे.
मागणीनुसार पुरवठा या तत्त्वानुसार सोन्याचे दर जरी कमी झाले तरी तेवढे सोने उपलब्ध होईल का हा मोठा प्रश्न आहे. सोन्याच्या करामध्ये 18% करा पैकी 12.50% टक्के कर हा आयात कर असतो. यापैकी आयात कर जास्त प्रमाणात कमी झाला तर सोन्याचे भाव नक्की कमी होतील. आणि त्याला मागणी देखील वाढेल आणि मागणी वाढल्यावर पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढतील, असा अंदाज चितळे यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget 2023, Gold, Local18, Nirmala Sitharaman, Pune