वाळूज औद्योगिक परिसरातील मोरे चौकात चार ते पाच दुकानांना भीषण आग. आग लागलेल्या दुकानांमध्ये दोन बॅटऱ्यांची दुकाने असल्याची प्राथमिक माहिती. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. घटनास्थळी अग्निशामक दलाचे दोन बंब दाखल, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती. आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही.