नवी दिल्ली, 31 डिसेंबर: जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही अपडेट (Aadhar Card Updation) करायचं असेल किंवा काही बदल करायचा असेल तर मोठ्या रांगेत उभं राहण्याची गरज नाही. तुम्ही घसरबसल्या याकरता अपॉइंटमेंट बुक करू शकता. असे केल्याने तुमचा वेळ वाचेल, अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर तुम्ही आधार सेवा केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्याचं काम पूर्ण करू शकता, शिवाय तुम्ही नवीन आधार कार्ड देखील बनवू शकता. UIDAI ने केलं ट्वीट UIDAI ने याबाबतीत ट्विटरवरून माहिती दिली आहे. UIDAI च्या माहितीनुसार ही अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्हाला https://appointments.uidai.gov.in/bookappointment.aspx या लिंकवर क्लिक करावं लागेल. याठिकाणी तुमची अपॉइंटमेंट बुक केल्यास मोठ्या रांगेत घालवावा लागणारा वेळ वाचणार आहे. तुम्हाला निर्धारित वेळेत आधार सेवा केंद्रावर पोहोचून काम पूर्ण करता येईल.
#MeraAadhaarMeriPehchaan
— Aadhaar (@UIDAI) December 30, 2020
आधार केंद्र में सेवाएँ लेने के लिए आप घर बैठे अपना अपॉइंटमेंट ऑनलाइन बुक कर सकते हैं, इसके लिए लिंक https://t.co/QFcNEqehlP पर क्लिक करें और लम्बी कतारों से बचें। अपॉइंटमेंट वाले दिन और निर्धारित समय पर आधार केंद्र पहुचें और सेवाओं का लाभ उठाएँ। #Aadhaar pic.twitter.com/bJOdb6rsDz
आधार केंद्रात जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कशाप्रकारे बुक कराल अपॉइंटमेंट? -याकरता तुम्हाला https://uidai.gov.in/ या वेबसाइटवर जावे लागेल. -होम पेजमधील my aadhar असा पर्याय दिसेल. त्यावर तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्यूटरचा कर्सर नेल्यानंतर Book an Appointment असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा (हे वाचा- FASTag कसा खरेदी करायचा? वाचा संपूर्ण माहिती एका पेजवर ) -किंवा तुम्ही थेट UIDAI ने ट्वीटमध्ये दिलेली लिंक- https://appointments.uidai.gov.in/bookappointment.aspx यावर जाऊ शकता. -बुकिंग पेज उघडल्यानंतर तुमचं शहर किंवा इतर ठिकाण निवडा -नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक सेवेनुसार पर्याय निवडा -याठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. तुमच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंगचे डिटेल्स मिळतील. **(हे वाचा-** नवीन वर्ष नवीन वेबसाइट! IRCTC वर आता काही सेकंदात बुक होणार रेल्वे तिकिट) वेळ आणि शुल्क? ही सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट तारीख आणि टाइम स्लॉटची निवड करावी लागते. त्या वेळेत तुम्हाला ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळून जाईल. आधार सेवा केंद्र आठवड्यातील सहा दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत सुरू असतात. दरम्यान ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.