मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नवीन वर्ष नवीन वेबसाइट! IRCTC वर आता काही सेकंदात बुक होणार रेल्वे तिकिट, वाचा काय आहेत फीचर्स

नवीन वर्ष नवीन वेबसाइट! IRCTC वर आता काही सेकंदात बुक होणार रेल्वे तिकिट, वाचा काय आहेत फीचर्स

IRCTC New Website: भारतीय रेल्वे आयआरसीटीसीची नवीन वेबसाइट आज लाँच करणार आहे. काही नवीन फीचर्स आणि सुविधा यामध्ये जोडल्या जात आहे. जाणून घ्या या अपग्रेडेशनमुळे प्रवाशांना काय  फायदा होणार आहे.

IRCTC New Website: भारतीय रेल्वे आयआरसीटीसीची नवीन वेबसाइट आज लाँच करणार आहे. काही नवीन फीचर्स आणि सुविधा यामध्ये जोडल्या जात आहे. जाणून घ्या या अपग्रेडेशनमुळे प्रवाशांना काय फायदा होणार आहे.

IRCTC New Website: भारतीय रेल्वे आयआरसीटीसीची नवीन वेबसाइट आज लाँच करणार आहे. काही नवीन फीचर्स आणि सुविधा यामध्ये जोडल्या जात आहे. जाणून घ्या या अपग्रेडेशनमुळे प्रवाशांना काय फायदा होणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 31 डिसेंबर: आयआरसीटीसीच्या (IRCTC) च्या वेबसाइटवर दररोज लाखो लोक तिकिट बुक करतात. अशावेळी अनेकदा ही ई-तिकिट सुविधा देणारी वेबसाइट हँग होते किंवा स्लो होते. त्यामुळे रेल्वे तिकिट बुक करताना प्रवाशांकडून काहीतरी गोंधळ होतो किंवा तिकिट बुक होत नाही. दरम्यान भारतीय रेल्वेने (Indian Railway) IRCTC ची वेबसाइट आणि अ‍ॅप दोन्ही अपग्रेड करत आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनी दिलेल्या माहितीनुसार ही नवीन वेबसाइट आज लाँच होणार आहे. 31 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पीयूष गोयल यांच्या हस्ते ही वेबसाइट लाँच केली जाणार आहे. नवीन वेबसाइटमध्ये जास्त युजर फ्रेंडली फीचर्स असणार आहेत. अनेक बदलांनंतर बुकिंग देखील वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वेबसाइट अपग्रेड झाल्यामुळे सहज होईल तिकिट बुक

-आयआरसीटीसी वेबसाइट आणि अ‍ॅप अपग्रेड झाल्यानेतर प्रवाशांना पूर्वीपेक्षा जास्त वेगाने आणि त्रासाशिवाय तिकिट बुक करता येणार आहे.

- भारतीय रेल्वेने (Indian Railway) अधिकृत निवेदनात असं म्हटलं आहे की, भारतीय रेल्वे त्यांच्या ई-तिकिट वेबसाइटमध्ये युजर पर्सनलायझेशन आणि फॅसिलिटी वाढवण्यावर काम करत आहे.

(हे वाचा-Gold Rates Today: तीन दिवसांनी स्वस्त झालं सोनं, वाचा काय आहेत बुधवारचे दर)

-IRCTC च्या नव्या वेबसाइटमध्ये जास्त फीचर्स असतील आणि तिकिट बुकिंग देखील सोप्या पद्धतीने होईल.

-यामध्ये तिकिट बुकिंग प्रमाणेत जेवणाचं बुकिंग करण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे.

-अपग्रेडेशननंतर वेबसाइट हँग होण्याची समस्या उद्भवणार नाही

-आता या अपग्रेडेशननंतर वेबसाइटवर अधिक जाहीराती दिसणार असल्याने आयआरसीटीसीला अधिक महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे.

-या नव्या वेबसाइटवर मिनिटाला 10000 पेक्षा जास्त तिकिट्स बुक होतील, सध्या यावर 7500 तिकिट्स मिनिटाला बुक होत आहेत.

IRCTC ने सुरू केली  'Book now pay later' सुविधा

आयआरसीटीसीने एक नवीन पोस्ट पेड पर्याय देखील सुरू केला आहे. या सुविधेअंतर्गत वेबसाइटवर आधी तिकिट बुक करून नंतर पेमेंट करण्याचा पर्याय आहे. यामध्ये प्रवासी तिकिट बुक केल्यानंतर e-payments च्या माध्यमातून 15 दिवसांच्या आतमध्ये कधीही पेमेंट करू शकतात किंवा तिकिट डिलिव्हरीच्या 24 तासांच्या आतमध्ये पेमेंट करता येते.

(हे वाचा-एप्रिलपासून तुमच्या हातात येणारा पगार कमी होण्याची शक्यता, काय आहे सरकारची योजना)

रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railway) प्रवाशांसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून ई-तिकिट सुविधा दिली जाते. रेल्वेच्या मते,  2014 सालापासून, तिकिट बुकिंगचा अनुभव सुधारण्यासाठी तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांच्या योग्य सोयी उपलब्ध व्हाव्यात यावर जोर देण्यात येत आहे.

First published:

Tags: Indian railway, IRCTC