मराठी बातम्या /बातम्या /मनी /

FASTag कसा खरेदी करायचा? वाचा संपूर्ण माहिती एका पेजवर

FASTag कसा खरेदी करायचा? वाचा संपूर्ण माहिती एका पेजवर


फास्टॅगची किंमत दोन गोष्टींवर ठरते. त्या दोन गोष्टी म्हणजे, तुमच्या वाहनाचा प्रकार आणि तुम्ही ज्या माध्यमातून खरेदी करताय ती बँक.

फास्टॅगची किंमत दोन गोष्टींवर ठरते. त्या दोन गोष्टी म्हणजे, तुमच्या वाहनाचा प्रकार आणि तुम्ही ज्या माध्यमातून खरेदी करताय ती बँक.

फास्टॅगची किंमत दोन गोष्टींवर ठरते. त्या दोन गोष्टी म्हणजे, तुमच्या वाहनाचा प्रकार आणि तुम्ही ज्या माध्यमातून खरेदी करताय ती बँक.

नवी दिल्ली, 31 डिसेंबर: एक जानेवारी 2021पासून राष्ट्रीय महामार्गांवरच्या (Natioanl Highways) देशभरातल्या सगळ्या टोल नाक्यांवर (Toll Plaza) सर्व वाहनांकडून फास्टॅग (FASTag) पद्धतीनेच टोल स्वीकारणं बंधनकारक करण्यात आलं आहे. फास्टॅग ही टोल भरण्याची इलेक्ट्रॉनिक, संपर्करहित यंत्रणा (Electronic Contactless System) आहे. त्या पद्धतीमुळे टोल नाक्यांवरील व्यवहार रोखीच्या व्यवहारांपेक्षा वेगाने होतील आणि टोल नाक्यांवर वाहनांना थांबावं लागण्याचा कालावधीही कमी होईल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. एक जानेवारीची मुदत आता अगदीच संपत आली आहे. त्या निमित्ताने, फास्टॅगसंदर्भातल्या काही शंकांचे निरसन करणारी ही माहिती.. - फास्टॅग विकत कसा घेता येतो? (Buy FASTag) त्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुमच्या कारसाठी फास्टॅग खरेदी करायचा असेल, तर तुमची ओळख कागदपत्रं आणि वाहनाची नोंदणी कागदपत्रं सादर करून काही ठरावीक टोल नाक्यांवरून फास्टॅग खरेदी करता येऊ शकतो. KYC प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे Amazon.in वरूनही तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता. त्याशिवाय काही बँका आणि पेमेंट्स बँकांच्या माध्यमातूनही तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता. सध्या ही सेवा पुरवणाऱ्या बँकांमध्ये HDFC Bank, ICICI Bank, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कोटक बँक, अ‍ॅक्सिस बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आदींचा समावेश आहे. बँकांच्या माध्यमातून खरेदीसाठी तुम्हाला या बँकांच्या वेबसाइटवर जावं लागेल. पेटीएम किंवा एअरटेल पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून खरेदी करायचा असेल, तर त्यांच्या फोन अ‍ॅप्सद्वारेही खरेदी करता येऊ शकेल. - फास्टॅगची किंमत किती आहे? फास्टॅगची किंमत दोन गोष्टींवर ठरते. त्या दोन गोष्टी म्हणजे, तुमच्या वाहनाचा प्रकार आणि तुम्ही ज्या माध्यमातून खरेदी करताय ती बँक. कार, जीप, व्हॅन किंवा बस-ट्रक किंवा मालवाहतूक करणारं हलकं वाहन, बांधकामाची मशिन्स आदी वाहनप्रकारानुसार फास्टॅगची किंमत वेगवेगळी असते. तसंच, प्रत्येक बँकेने फास्टॅग देण्याचं शुल्क (Issuance Fees) आणि सिक्युरिटी डिपॉझिट्स (Security Deposits) याचे आपापले वेगळे नियम बनवले आहेत. सध्या समजा तुम्ही पेटीएमवरून (Paytm) कारसाठी फास्टॅग खरेदी करणार असाल, तर त्यासाठी 500 रुपये मोजावे लागतील. त्यात 250 रुपये रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिटचे असतील. तसंच कमीत कमी 150 रुपये तुमच्या फास्टॅग खात्यात कायम शिल्लक ठेवावेच लागतील. ICICI बँकेकडून खरेदी करायचा असेल, तर टॅग इन्श्युरन्स फी म्हणून 99.12 रुपये घेतले जातील. अधिक 200 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून, तर 200 रुपये मिनिमम बॅलन्स म्हणून आकारले जातील. किंमतीत वेळोवेळी असे छोटे-मोठे फरक असू शकतात; पण बँका नवा फास्टॅग खरेदी करताना काही ऑफर्स देतात किंवा कॅशबॅक्स देऊ करतात, ही गोष्टही लक्षात घ्यावी. - फास्टॅग रिचार्ज (Recharge) कसा करायचा? फास्टॅग रिचार्ज करणं सोपं आहे. त्यासाठी दोन पर्याय आहेत. फास्टॅग ज्या बँकेकडून घेतला असेल, त्या बँकेचं फास्टॅग वॉलेट वापरणं हा पहिला पर्याय. हे वॉलेट इंटरनेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डस् किंवा यूपीआय आदी पर्यायांद्वारे रिचार्ज करता येतं; मात्र यात काही वेळा अडचणी येऊ शकतात. दुसरा पर्याय आहे पेटीएम किंवा फोनपे यांसारख्या मोबाइल वॉलेट अ‍ॅप्सचा. बँकेपेक्षा याद्वारे रिचार्ज करण्याचा अनुभव अधिक चांगला असतो. एअरटेल पेमेंट्स बँक, बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक, इक्विटास बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, ICICI बँक, इंडसइंड बँक, करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, साउथ इंडियन बँक या बँकांकडून घेतलेला फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी अ‍ॅमेझॉन पेचा पर्यायही वापरू शकता. अ‍ॅक्सिस बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे खरेदी केलेले फास्टॅग रिचार्ज करण्याचा पर्यायही लवकरच अ‍ॅमेझॉनवर येणार आहे. अ‍ॅमेझॉनवर Amazon Pay>Bills>FASTag अशा प्रकारे तुम्हाला रिचार्जचा ऑप्शन सापडेल. तुम्हाला फोन-पेद्वारे रिचार्ज करायचं असेल, तर एअरटेल पेमेंट्स बँक, अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, ICICI बँक, IDFC Bank, IDBI First Bank, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी फास्टॅग, इंडियन इंडसइंड बँक, करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, पेटीएम पेमेंट्स बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक, साउथ इंडियन बँक, RBL FASTag यांच्याद्वारे घेतलेला फास्टॅग रिचार्ज करता येऊ शकतो. हा पर्याय तुम्हाला फोन-पे अ‍ॅपमध्ये Recharge And Bills > See All > Recharges > FASTag Recharge अशा क्रमाने मिळू शकेल. पेटीएमद्वारे तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता, रिचार्ज करू शकता, शिवाय दुसऱ्या बँकांद्वारे खरेदी केलेल्या फास्टॅगचं व्यवस्थापनही करू शकता. अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ बरोडा, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, एचडीएफसी बँक, IDFC First Bank, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी फास्टॅग, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक आदींद्वारे खरेदी केलेल्या फास्टॅगचं व्यवस्थापन सध्या पेटीएमद्वारे करणं शक्य आहे. पेटीएम अ‍ॅपमध्ये गेल्यावर My Paytm > All Services > Manage FASTag या क्रमाने तुम्हाला पर्याय शोधता येईल. गुगल पेद्वारेही तुम्हाला तुमच्या वाहनाचा फास्टॅग रिचार्ज करता येऊ शकतो. सध्या एचडीएफसी बँक, ICICI बँक, IDFC First Bank, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी फास्टॅग, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक आदींद्वारे खरेदी केलेल्या फास्टॅगमध्ये गुगल पेद्वारे रिचार्ज करता येऊ शकतं. गुगल पेमध्ये Businesses and Bills या सेक्शनमध्ये गेल्यावर FASTag असं सर्च केल्यावर तुम्हाला संबंधित बँक्स आणि फास्टॅग्जची यादी दिसेल. त्यातून आवश्यक तो पर्याय निवडून तुम्ही व्यवहार पूर्ण करू शकता.
First published:

Tags: Money

पुढील बातम्या