नवी दिल्ली, 27 जानेवारी : नव्या वर्षातला पहिला महिना आता संपत आलाय. त्याचबरोबर मुलांच्या अॅडमिशन सुरू होतील. पालकांना मुलांसाठी सगळ्यात चांगल्या शाळेची निवड करायची असते. मुलांच्या अॅडमिशनसाठी ज्या कागदपत्रांची गरज लागते त्यात आधार कार्डही (Aadhaar Card)आहे. त्यामुळेच मुलांच्या आधार कार्डसाठी UIDAI मध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.
5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी
आधार कार्ड 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांसाठी बनवलं जातं. तुमचा मुलगा किंवा मुलगी 5 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर त्यासाठी बर्थ सर्टिफिकेटची गरज लागेल. हे प्रमाणपत्र नसेल तर मुलांच्या पालकांपैकी एकाचं आधार कार्ड दाखवून काम होऊ शकतं. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही पण त्याचं वय 5 वर्षांपेक्षा अधिक झालं तर बायोमेट्रिक रेकॉर्ड अपडेट करावं लागतं.
(हेही वाचा : बजेट 2020 : मोदी सरकारने PF वरचे व्याजदर केले जाहीर, तुमची होणार बचत)
1. मुलांचं आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्ही जवळचं पोस्ट ऑफिस किंवा आधार सेवा केंद्रात जाऊ शकता.
2. तुमच्याकडे मुलांचं व्हॅलिड अॅड्रेस प्रूफ नसेल तर पालकांचा आधार नंबर भरावा लागेल.
3. सगळी गरजेची कागदपत्रं सादर करून तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल.
(हेही वाचा : ऑनलाइन फूड ऑर्डर करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार्जेस वाढल्यामुळे खाणं झालं महाग)
4. हा फॉर्म जमा केल्यानंतर मुलांचं बायोमेट्रिक रेकॉर्ड रेकॉर्ड केलं जाईल. यामध्ये 10 बोटांचं फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि फोटो काढला जाईल.
5. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक एनरोलमेंट स्लिप जनरेट करून तुम्हाला दिलं जाईल.
===========================================================================================