नवी दिल्ली, 27 जानेवारी : तुम्ही जर नेहमी ऑनलाइन फूड डिलिव्हरी मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) ने मागच्या 6 महिन्यांत डिलिव्हरीचे चार्जेस वाढवले आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, या कंपन्यांनी डायनॅमिक डिस्काउंट देणं सुरू केलं आहे. त्याचबरोबर या कंपन्यांनी ऑर्डर रद्द करण्याचे नियमही कडक केले आहेत. गेल्याच आठवड्यात 'झोमॅटो' ने उबर इट्स (Uber Eats India )ही कंपनी विकत घेतली आहे. या डीलनुसार उबरला 'झोमॅटो' 9.99 टक्के शेअर्स मिळाले. झोमॅटोच्या हिशोबाने या शेअर्सची किंमत 2500 कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.
किती वाढले दर?
झोमॅटो (Zomato)ने ऑन टाइम ऑर फ्री डिलिव्हरी नावाची एक योजना सुरू केली होती. याचा अर्थ, एखाद्या कस्टमरने निवडक रेस्टॉरंटला 10 रुपये जादा दिले आणि वेळेत डिलिव्हर झाली नाही तर ऑर्डर फ्री दिली जाईल. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार या कंपन्यांनी ही सूट कमी केल्यानंतर ऑर्डरच्या संख्येत घट झाली. 'झोमॅटो' च्या बाबतीत ऑक्टोबरपासून दर महिन्याला ऑर्डर्सच्या संख्येत 5 ते 6 टक्के कमी झाल्याचा अंदाज आहे.
(हेही वाचा : मोदी सरकारच्या योजनेचा 60 दिवसांमध्ये घ्या लाभ, महिन्याला मिळतील 10 हजार)
'स्विगी'(swiggy)
स्विगीच्या बाबतीतही डिसेंबरमध्ये ऑर्डर्समध्ये घट झाली. स्विगीने आपल्या गोल्ड मेंबरशिपसाठीचे दरही वाढवले आहेत. त्याचबरोबर चेकआउट्सवर क्रॉस सेलिंग सुरू केलं आहे. त्यामुळे साइड ऑफरिंग्जच्या माध्यमातून अॅव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू वाढवली जाईल.याचा परिणाम या कंपन्यांच्या एकूण व्यवसायावर होईल, अशी चिन्हं आहेत.
(हेही वाचा : बजेटमधून सर्वसामान्यांना मिळू शकतो मोठा दिलासा, टॅक्स स्लॅब कमी होणार?)
======================================================================================