Home /News /money /

बजेट 2020 : मोदी सरकारने PF वरचे व्याजदर केले जाहीर, तुमची होणार बचत

बजेट 2020 : मोदी सरकारने PF वरचे व्याजदर केले जाहीर, तुमची होणार बचत

केंद्र सरकारने (Central Government) ने जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी जनर प्रॉव्हिडंट फंड (GPF)वर मिळणारे व्याजदर जाहीर केले आहेत. अर्थमंत्रालयाने याबद्दल एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.

    नवी दिल्ली, 27 जानेवारी : केंद्र सरकारने (Central Government) ने जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी जनर प्रॉव्हिडंट फंड (GPF)वर मिळणारे व्याजदर जाहीर केले आहेत. अर्थमंत्रालयाने याबद्दल एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. जानेवारी ते मार्च 2020 पर्यंत GPF वर 7.9 टक्के दराने व्याज मिळेल. एक वर्ष पूर्ण करणारे अस्थायी कर्मचारी, रि एम्प्लॉइड पेन्शनर्स आणि सगळे कायमस्वरूपी कर्मचारी जनरल प्रॉव्हिडंट फंड नियम 1960 च्या कक्षेत येतात. छोट्या बचत योजनांवरचे व्याजदर बदलले याआधी पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांववरचे व्याजदर जानेवारी ते मार्च या काळात स्थिर ठेवले होते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अशा पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांसाठी जानेवारी ते मार्च 2020 या काळात व्याजदर 7.9 टक्के राहील. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी या योजनेवरच्या व्याजदरात काहीही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता. 1. जनरल प्रॉव्हिडंट फंड सेंट्रल सर्व्हिसेस 2. काँट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड 3. ऑल इंडिया सर्व्हिस प्रॉव्हिडंट फंड 4. स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड (हेही वाचा : मातीच्या घरात ऑफिस आणि मैदानाचा रनवे, 'एअर इंडिया'ने असा घेतला टेक ऑफ) 5. जनरल प्रॉव्हिडंट फंड डिफेन्स सर्व्हिसेस 6. इंडियन ऑर्डिनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड 7. इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीज वर्कमेन्स प्रॉव्हिडंट फंड 8. इंडियन नेवल डॉकयार्ड वर्कमेन्स प्रॉव्हिडंट फंड (हेही वाचा : ऑनलाइन फूड ऑर्डर करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार्जेस वाढल्यामुळे खाणं झालं महाग) 9. डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड 10. आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड या योजनांवरच्या व्याजदरात बदल करण्यात आला आहे. सरकारने हे व्याजदर जाहीर केले आहेत. ======================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Budget 2020, EPF, Money

    पुढील बातम्या