मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ही आहेत 5 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती, आजच उघडा खाते आणि मिळवा बंपर फायदा

ही आहेत 5 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती, आजच उघडा खाते आणि मिळवा बंपर फायदा

 देशातील काही बँका झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाऊंट (Zero Balance Savings Accounts) ऑफर करत आहेत. जाणून घ्या अशा कोणत्या बँकां आहेत ज्यामध्ये तुम्हाला झिरो बॅलन्स खाते तर उघडता येतेच पण त्याचबरोबर उत्तम बेनिफिट्स देखील मिळतात.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : अनेक बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स नसल्यास बँक ग्राहकांकडून दंड वसुल करते. पण काही बँकांमध्ये असणारी कमीतकमी शिल्लक 10 हजार रुपये ठेवणे अनेकांना शक्य होत नाही. अशा लोकांसाठी देशातील काही बँका झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाऊंट (Zero Balance Savings Accounts) ऑफर करत आहेत. यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसते. जाणून घ्या अशा कोणत्या बँकां आहेत ज्यामध्ये तुम्हाला झिरो बॅलन्स खाते तर उघडता येतेच पण त्याचबरोबर उत्तम बेनिफिट्स देखील मिळतात. 1. आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank)- प्रथम बचत खाते या झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यामध्ये तुम्ही कोणत्याही एटीएममधून कितीही ट्रान्झॅक्शन करण्याचा फायदा मिळतो. तुम्ही मोबाइल बँकिंग आणि नेटबँकिंगच्या सेवा मोफत मिळवू शकता. आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही जवळच्या शाखेत खाते उघडू शकाल. या बँकेत झिरो बॅलन्स बचत खात्यावर 6 ते 7 टक्के व्याज मिळते. 2. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)- बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट तुम्ही हे खाते वैध केवायसी कागदपत्रांच्या सहाय्याने उघडू शकता. बँक तुम्हाला Rupay कम डेबिट कार्ड देईल. यामध्ये तुम्हाला एसबीआय एटीएम आणि अन्य बँकांच्या एटीएममधून 4 कॅश विड्रॉल मोफत मोफत मिळेल. या बँकेतील बचत खात्यावर वार्षिक 2.75 टक्के व्याज मिळेल. (हे वाचा-देशातील 1.35 कोटी शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून अद्याप मिळाले नाहीत 2000 रुपये) 3. इंडसइंड बँक (IndusInd Bank)- इंडसइंड ऑनलाइन सेव्हिंग अकाऊंट या खात्यामध्ये अनलिमिटेड एटीएम ट्रान्झॅक्शनचा फायदा मिळतो. तसंच मोबाइल बँकिंग आणि नेटबँकिंगच्या सेवा मोफत मिळतात. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आधार आणि पॅन देऊन झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडू शकता. या खात्यामध्ये 4 ते 6 टक्क्यापर्यंत व्याज मिळते. 4. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) - 811 डिजिटल बँक अकाऊंट-या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. डिजिटल बँकिंगचा वापर करून हे खाते उघडता येईल. यामध्ये तुम्हाला 811 व्हर्च्यूअल डेबिट कार्ड मिळेल. याचा वापर करून तुम्ही ऑनलाइन शॉपिंग, बिल पेमेंट आणि DTH रिचार्ज करू शकता. या बँक खात्यामध्ये 4 टक्के व्याज मिळते (हे वाचा-ATM मधून पैसे नाही आले तरी खात्यातून कापले गेले पैसे, वाचा अशावेळी काय कराल?) 5. एचडीएफसी बँक (HDFC Bank)- बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट- झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्याबरोबरच खातेधारकांना एटीएम कम डेबिट कार्ड, फ्री पासबुक सेवा, फ्री डिपॉझिट, विड्रॉल आणि बरोबरच चेकबुक, ईमेल स्टेटमेंट, डिमांड ड्राफ्ट यांसारख्या सेवा मोफत मिळतात. त्याचप्रमाणे नेटबँकिंग, फोन बँकिंग आणि मोबाइल बँकिंग यांसारख्या सेवा मिळतात. दर महिन्याला 4 कॅश विड्रॉलची मर्यादा आहे. या खात्यामध्ये 3 के 3.5% दराने व्याज मिळते.
First published:

Tags: Money, SBI, SBI bank

पुढील बातम्या