जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ATM मधून पैसे नाही आले तरी खात्यातून कापले गेले पैसे, वाचा अशावेळी काय कराल?

ATM मधून पैसे नाही आले तरी खात्यातून कापले गेले पैसे, वाचा अशावेळी काय कराल?

ATM मधून पैसे नाही आले तरी खात्यातून कापले गेले पैसे, वाचा अशावेळी काय कराल?

एटीएममधून पैसे काढताना अनेकदा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागतो. कधीकधी असे होते की, ATM मधून पैसे काढल्यानंतर तु्मचे ट्रान्झॅक्शन तर फेल (ATM Transaction Failed) होते पण खात्यातून पैसे कापले जातात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 ऑक्टोबर : एटीएममधून पैसे काढताना अनेकदा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागतो. कधीकधी असे होते की, ATM मधून पैसे काढल्यानंतर तु्मचे ट्रान्झॅक्शन तर फेल (ATM Transaction Failed) होते पण खात्यातून पैसे कापले जातात. अर्थात एटीएम मशिनमधून पैसे बाहेर येत नाहीत. त्याचप्रमाणे एटीएम मशिनमधून जी पावती तुम्हाला मिळते त्यावरही पैसे खात्यातून वजा झाल्याचे नमुद केलेले असते. एटीएममधील काही बिघाडामुळे असा प्रकार घडू शकतो. काही प्रकरणात एटीएम मशिन ट्रान्झॅक्शन स्विकारत नाही आणि तुम्हाला काही वेळात तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज येऊन जातो. काही परिस्थितीत तुमच्या खात्यात हे पैसे क्रेडिट होत नाहीत. जर तुमच्या खात्यात फेल झालेल्या ट्रान्झॅक्शननंतरचे पैसे ऑटो क्रेडिट झाले नाहीत तर पुढील स्टेप्स फॉलो करा. - जेव्हा कधी एटीएमचा व्यवहार रद्द होतो, तेव्हा ATM मधून ट्रान्झॅक्शन फेलची पावती मिळते. ही पावती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा. कारण यामध्ये तुमच्या व्यवहाराचा रेफरन्स क्रमांक लिहलेला असतो. (हे वाचा- Gold Price: सोमवारी वाढ झाल्यानंतर आज सोन्याचांदीच्या दरात घसरण,इथे तपासा नवे दर ) - त्वरित तुमच्या खात्याचे स्टेटमेंट (Bank Account Statement) तपासा. जर तुमच्या खात्यातून पैसे वजा झाले असतील तर त्वरित तुमच्या बँकेशी संपर्क साधा -एटीएम मध्ये असणाऱ्या तक्रारपेटीमध्ये तुम्ही तक्रार दाखल करू शकता -बँकेशी संपर्क करणे आवश्यक आहे (हे वाचा- या बँकांमध्ये FD केल्यास मिळत आहे सर्वाधिक नफा,1 वर्षासाठी आहे 7% पर्यंत व्याजदर) -जर तुम्ही बँकेच्या ब्रँचमध्ये नाही जाऊ शकत तर बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि त्याठिकाणी देण्यात आलेल्या कस्टमर केअरशी संपर्क करा. त्याठिकाणी तुम्ही तुमच्या ट्रान्झॅक्शनची माहिती देऊ शकता. -तुम्ही या ट्रान्झॅक्शनविषयी बँकेला मेल देखील करू शकता आणि त्यांच्याकडे मदत मागू शकता. -तुम्हाला बँकेकडून 24 तासांच्या आतमध्ये संपर्क केला जाईल आणि तुमच्या खात्यातून वजा झालेले पैसे 7 वर्किंग डेजमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM , sbi ATM
  • First Published :
जाहिरात
जाहिरात