मराठी बातम्या /बातम्या /मनी /

देशातील 1.35 कोटी शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत 2000 रुपये, मोदी सरकारकडून लवकरच मदतीची अपेक्षा

देशातील 1.35 कोटी शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत 2000 रुपये, मोदी सरकारकडून लवकरच मदतीची अपेक्षा

अर्ज करूनही तुम्हाला पीएम शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये मिळाले नाही आहेत का? अद्याप 10.6 टक्के शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन होणे बाकी आहे

अर्ज करूनही तुम्हाला पीएम शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये मिळाले नाही आहेत का? अद्याप 10.6 टक्के शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन होणे बाकी आहे

अर्ज करूनही तुम्हाला पीएम शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये मिळाले नाही आहेत का? अद्याप 10.6 टक्के शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन होणे बाकी आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : अर्ज करूनही देशातील 1.35 कोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ अद्याप मिळालेला नाही. दिलेल्या माहितीमध्ये काहींनी गोंधळ केल्यामुळे अनेकांचे व्हेरिफिकेशन झालेले नाही. या योजनेत अनेक ठिकाणी घोटाळा देखील समोर आला आहे. त्यामुळे सरकारकडून व्हेरिफिकेशनवर अधिक भर दिला जात आहे. योग्य व्यक्तींच्या हातात पैसे पोहोचवण्याचे सरकारचे ध्येय आहे. अशावेळी अर्जदारांनी त्यांची माहिती देताना काही गडबड केली असल्यास त्याचे व्हेरिफिकेशन करण्याचे काम सरकारकूडन सुरू आहे. मोदी सरकारने या योजनेअंतर्गत 14.5 कोटी शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. याकरता अद्याप 11 कोटी 34 लाख वैध अर्ज मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 35,38,082 शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन बाकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 7,92,584 शेतकऱ्यांची माहिती अद्याप सत्यापित होणे बाकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मध्य प्रदेशमध्ये 7,36,292 शेतकरी अद्याप त्यांच्या माहितीचे व्हेरिफिकेशन व्हावे याच्या प्रतिक्षेत आहेत. (हे वाचा-ATM मधून पैसे नाही आले तरी खात्यातून कापले गेले पैसे, वाचा अशावेळी काय कराल?) तुमची ही चुक पडेल महागात पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतील अर्जदारांच्या नावात आणि बँक खात्याच्या डिटेल्समध्ये गडबड आहे. बँक खात्यातील तसच इतर कागदपत्रांवरील नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे. ज्यामुळे ऑटोमॅटिक सिस्टिम त्यांचा अर्ज पास करत नाही आहे. असेही काही जिल्हे आहेत ज्यांचे व्हेरिफिकेशन या कारणामुळे थांबले आहे. जेव्हा राज्यांकडून शेतकऱ्यांची माहिती व्हेरिफाय केली जाते, तेव्हाच केंद्राकडून त्यांना मदत पाठवली जाते. व्हेरिफिकेशन करताना सरकार कठोर राहण्याचे कारण देशभरातील विविध ठिकाणी मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये  (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme)घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. तमिळनाडू ते उत्तर प्रदेशमधील बाराबंकी आणि मिर्झापूर याठिकाणाहून मोठे घोटाळे समोर आले. गेल्या महिन्यातच असे समोर आले होते की, यूपीमधील बाराबंकी याठिकाणी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. अडीच लाख अपात्र नागरिकांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. प्रशासनाकडून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (हे वाचा-सोन्यामध्ये गुंतवणूक करताना बँकेतून खरेदी करू नका सोन्याची नाणी, हे आहे कारण) याआधी सप्टेंबरमध्येच गाझीपूरमध्ये असेच प्रकरण समोर आले होते. याठिकाणी 1.5 लाख बनावट शेतकऱ्यांची नावं रद्द करण्यात आली आहेत. व्हेरिफिकेशन करून अपात्र शेतकऱ्यांकडून पैशांची रिकव्हरी करण्याचे काम सुरू आहे. तमिळनाडू राज्यात याप्रकरणी देशातील सर्वात मोठी कारवाई झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याठिकाणी 96 कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. 34 अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. एकूण 13 जिल्ह्यांमध्ये FIR दाखल केल्यानंतर 52 लोकांना अटक करण्यात आली आहे. अशी सुधारा तुमची चुक सर्वात आधी PM-Kisan Scheme या वेबसाइटवर जा. ज्याठिकाणी असणाऱ्या फार्मर कॉर्नरवर जाऊन Edit Aadhaar Details वर क्लिक करा.याठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल. त्याचप्रमाणे साइटवर देण्यात आलेला कॅप्चा कोड देखील टाकावा लागेल. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावात झालेली चुक सुधारू शकता. ऑनलाइनच हे काम पूर्ण होईल. यासंदर्भाक आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही कृषी अधिकारी किंवा लेखापालांशी संपर्क करू शकता.
First published:

Tags: PM Kisan

पुढील बातम्या