पुढील वर्षी 2021 मध्ये नोकरदारांच्या हातामध्ये येणारा पगार कमी होऊ शकतो. केंद्र सरकारच्या न्यू वेज कोड अंतर्गत कंपन्यां पे पॅकेज (Pay Package) रिस्ट्रक्चर करतील. अशी शक्यता आहे की, एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ आणि ग्रॅच्यूटीच्या नियमात बदल होईल. सरकार नवीन Compensation नियम (New Compensation Rule) लागू करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये बदलाव पाहायला मिळेल. हे नियम गेल्यावर्षी संसदेत पारित झालेल्या वेज कोडचा भाग आहेत. पुढील फायनान्शिअल वर्षामध्ये पगाराची नवीन परिभाषा सुरू होणार आहे. या नवीन नियमात अलाउन्सची मर्यादा निश्चित आहे. हा एकूण सॅलरीच्या 50 टक्क्यापेक्षा जास्त नसेल.