मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Rates Today: तीन दिवसांनी स्वस्त झालं सोनं, वाचा काय आहेत बुधवारचे दर

Gold Rates Today: तीन दिवसांनी स्वस्त झालं सोनं, वाचा काय आहेत बुधवारचे दर

Gold Silver Price on 30th December 2020: भारतीय बाजारात बुधवारी तीन दिवसांनंतर सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. दरम्यान आज चांदीच्या किंमती वधारल्याचं पाहायला मिळालं.

Gold Silver Price on 30th December 2020: भारतीय बाजारात बुधवारी तीन दिवसांनंतर सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. दरम्यान आज चांदीच्या किंमती वधारल्याचं पाहायला मिळालं.

Gold Silver Price on 30th December 2020: भारतीय बाजारात बुधवारी तीन दिवसांनंतर सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. दरम्यान आज चांदीच्या किंमती वधारल्याचं पाहायला मिळालं.

  नवी दिल्ली, 30 डिसेंबर: भारतीय  बाजारात बुधवारी तीन दिवसांनंतर सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. दरम्यान आज चांदीच्या किंमती वधारल्याचं पाहायला मिळालं. एचडीएफसी सिक्योरिटीजने सोन्याचांदीच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात 30 डिसेंबर 2020 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति तोळा 16 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात 205 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढले आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी कोरोना काळात (Coronavirus Pandemic) सोन्याचांदीच्या दरात एकंदरीत वाढच पाहायला मिळाली. जाणकारांच्या मते, अनिश्चित अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. त्यांच्या मते 2021 मध्ये देखील ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. सोन्याचे नवे दर (Gold Price on 30th December 2020) दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर किरकोळ 16 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. यानंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 49,484 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या तीन सत्रांमध्ये सोन्याचे दर वाढते होते. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 49,500 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,879 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा-एप्रिलपासून तुमच्या हातात येणारा पगार कमी होण्याची शक्यता, काय आहे सरकारची योजना) चांदीचे नवे दर (Silver Price on 30th December 2020) सोन्यामध्ये वाढ झाली नसली तरी चांदीमध्ये आज वाढ पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी चांदीच्या दरांत 205 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 67,673 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात चांदीचे भाव 67,468 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market)चांदीचे भाव  26.22 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते (हे वाचा-आठवड्याला LPG गॅस सिलेंडरचे दर बदलणार का? या प्रश्नावर सरकारचा खुलासा) आंतरराष्ट्रीय बाजारात का महागले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल (कमोडिटीज) यांच्या मते, कालपेक्षा आज डॉलर इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर वधारले आहेत. कोरोना व्हायरस पँडेमिक दरम्यान आर्थिक रिकव्हरीच्या चिंतेमुळे बुलियन मार्केट ते ट्रेड फर्म्सना सपोर्ट मिळाला आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Gold, Gold and silver prices today

  पुढील बातम्या