मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI MPC: सर्वसामान्यांना पुन्हा झटका बसणार? RBI ची तीन दिवसांची बैठक आजपासून सुरु

RBI MPC: सर्वसामान्यांना पुन्हा झटका बसणार? RBI ची तीन दिवसांची बैठक आजपासून सुरु

 बुधवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पॉलिसी दरांमध्ये वाढ किंवा कपात जाहीर करेल. या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास व्याजदरात 40 बेसिस पॉईंटने वाढ करतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बुधवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पॉलिसी दरांमध्ये वाढ किंवा कपात जाहीर करेल. या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास व्याजदरात 40 बेसिस पॉईंटने वाढ करतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बुधवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पॉलिसी दरांमध्ये वाढ किंवा कपात जाहीर करेल. या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास व्याजदरात 40 बेसिस पॉईंटने वाढ करतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मुंबई, 6 जून : देशभरात महागाई (Inflation) गगनाला भिडली आहे. सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त आहे. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवताना अनेकांची कसरत होत आहे. अशा परिस्थितीत महागाई कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. RBI ची चलनविषयक धोरण बैठक (RBI MPC Meeting) आज म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे. ही बैठक 3 दिवस चालणार आहे. बुधवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) पॉलिसी दरांमध्ये वाढ किंवा कपात जाहीर करेल. या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) व्याजदरात 40 बेसिस पॉईंटने वाढ करतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कर्जाचे EMI वाढू शकतात

RBI पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करू शकते. याचा परिणाम असा होईल की कर्जाचे ईएमआय पुन्हा एकदा महाग होऊ शकतात. जर तुम्ही आधीच कर्ज घेतले असेल, तर तुमचा EMI वाढेल आणि पुढे कर्ज घेण्याचा विचार करत असलात तरीही तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल. कारण आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर सर्व खाजगी आणि सरकारी बँका कर्जाचे व्याजदर वाढवतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होतो.

वीज बिलाच्या खर्चातून कायमचं मुक्त व्हा; सोलर पॅनल बसवा, सरकारकडून सबसिडी मिळेल

गेल्या महिन्यात झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत मध्यवर्ती बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. 4 मे रोजी झालेल्या पतधोरण बैठकीनंतर RBI ने अचानक रेपो दर 40 बेसिस पॉईंट्सने वाढवून 4.40 टक्के केला आणि कॅश रिझर्व्ह रेशो (Cash Reserve Ratio) 50 बेसिस पॉईंट्सने 4 टक्क्यांवरून 4.50 टक्क्यांवर नेला.

सोन्या-चांदीचे दर या आठवड्यात वाढणार की कमी होणार? कोणते घटक ठरतील निर्णायक

RBI ने 4 मे रोजी रेपो दरात 40 बेसिस पॉईंट वाढीची घोषणा केली, तेव्हापासून, सार्वजनिक-खाजगी बँकांपासून गृह वित्त कंपन्यांपर्यंत, गृहकर्जापासून ते इतर प्रकारची कर्जे महाग होत आहेत. त्यामुळे आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय महाग होत आहे. आणि ईएमआय महाग होण्याची प्रक्रिया इथेच थांबणार नाही. जूनमध्ये चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर कर्जदारांना पुन्हा झटका बसू शकतो.

आरबीआय या बैठकीत व्याजदरात आणखी 0.40 टक्के वाढ करू शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, ऑगस्टच्या आढाव्यातही ते 0.35 टक्क्यांनी वाढू शकते. जर असे झाले नाही तर आरबीआय पुढील आठवड्यात 0.50 टक्के आणि ऑगस्टमध्ये 0.25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Inflation, Rbi, Rbi latest news, Repo rate, Reserve bank of india, Shaktikanta das