जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सोन्या-चांदीचे दर या आठवड्यात वाढणार की कमी होणार? कोणते घटक ठरतील निर्णायक

सोन्या-चांदीचे दर या आठवड्यात वाढणार की कमी होणार? कोणते घटक ठरतील निर्णायक

सोन्या-चांदीचे दर या आठवड्यात वाढणार की कमी होणार? कोणते घटक ठरतील निर्णायक

व्यापार सप्ताहात सोन्याने 51390 रुपये प्रति दहा ग्रॅमची सर्वोच्च पातळी आणि 50415 रुपये प्रति दहा ग्रॅमची नीचांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 1854 डॉलरच्या पातळीवर बंद झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 जून : सोन्यामध्ये गुंतवणुकीबद्दल (Gold Investment) बोलायचे झाले तर, गेल्या आठवड्यात सोन्यामध्ये एका रेंजमध्ये व्यवहार झाला. खालच्या पातळीवर खरेदी आणि वरच्या पातळीवर विक्री झाली. देशांतर्गत बाजारात, MCX वर सोने (Gold Price Today) 50984 रुपयांच्या पातळीवर बंद झाले.व्यापार सप्ताहात सोन्याने 51390 रुपये प्रति दहा ग्रॅमची सर्वोच्च पातळी आणि 50415 रुपये प्रति दहा ग्रॅमची नीचांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 1854 डॉलरच्या पातळीवर बंद झाले. ट्रेडिंग दरम्यान, ते 1878 डॉलरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, स्पॉट सिल्व्हर प्रति औंस 21.94 डॉलरच्या पातळीवर बंद झाला. स्थानिक बाजारात चांदी एमसीएक्सवर 61660 रुपयांवर बंद झाली.

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाची किंमत 120 डॉलर पार; पेट्रोल-डिझेल महागलं की स्वस्त झालं?

IIFL सिक्युरिटीजचे कमोडिटी एक्सपर्ट अनुज गुप्ता यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात सराफा बाजारात एका रेंजमध्ये व्यवहार झाला. नवीन आठवड्यातील व्यापाराबाबत ते म्हणाले की, ट्रेडर्स 50700 रुपयांच्या पातळीवर सोने खरेदी करू शकतात. टार्गेट किंमत 51500 रुपये असेल, तर स्टॉप लॉस रुपये 50400 प्रति 10 ग्रॅम असेल. स्पॉट मार्केटमध्ये सोने 1870 ते 1880 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर पोहोचू शकते. चांदीबद्दल बोलायचे झाले तर 61 हजार रुपयांच्या पातळीवर खरेदी होऊ शकते. यासाठी स्टॉप लॉस 60 हजार रुपये असेल, तर टार्गेट किंमत 62500 ते 63000 रुपये असेल. स्पॉट मार्केटमध्ये अल्पावधीत चांदी 22.50 डॉलरच्या पातळीवर पोहोचू शकते. डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्या-चांदीच्या दरांना आधार मिळत आहे. टीव्ही 9 हिंदीने याबाबत वृत्त दिलं आहे.कोणते घटक सोन्याच्या किमतीवर परिणाम करू शकतात? » डॉलर निर्देशांकात कमजोरी राहिल्यास सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होईल. या आठवड्यात डॉलर निर्देशांक 0.45 टक्क्यांनी वधारला आणि 102.18 च्या पातळीवर बंद झाला. जर गुंतवणूकदारांनी या आठवड्यात डॉलरमध्ये प्रॉफिट बुकिंग केली तर त्याची किंमत कमी होईल, ज्यामुळे सोन्या-चांदीच्या किमती वाढतील. » रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची या आठवड्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ केल्यास रुपया मजबूत होईल. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला तर देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमती घसरतील. व्याजदर वाढवले ​​नाहीत तर भावात तेजी होण्याची शक्यता असते.

Multibagger Share: 11 रुपयांचा शेअर खरेदी करुन कमावले लाखो रुपये; तुमच्याकडे आहे का? » यूएस इन्फ्लेशन डेटा या आठवड्याच्या शेवटी येणार आहे. महागाईच्या आकडेवारीचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर होणार आहे. महागाई वाढल्यास, फेडरल रिझर्व्हवर व्याजदर वाढवण्याचा दबाव वाढेल. या घटकांचा थेट परिणाम स्पॉट मार्केटमधील सोन्या-चांदीवर होणार आहे. » युरोप आणि जपानचा जीडीपी डेटा या आठवड्यात समोर येणार आहे. हा डेटा जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती सांगेल. वाढीचा दर अपेक्षेपेक्षा कमजोर राहिला तर सोन्याच्या किमतीत वाढ होईल. » युरोपियन सेंट्रल बँकेची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. युरोपियन युनियनने रशियन तेलावर नव्याने बंदी घातली आहे. या बंदीमुळे इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत महागाई गगनाला भिडत आहे. याबाबत ECB काय निर्णय घेते, त्याचा थेट परिणाम महागाई आणि सोन्या-चांदीच्या किमतीवर होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात