Home /News /money /

वीज बिलाच्या खर्चातून कायमचं मुक्त व्हा; सोलर पॅनल बसवा, सरकारकडून सबसिडी मिळेल

वीज बिलाच्या खर्चातून कायमचं मुक्त व्हा; सोलर पॅनल बसवा, सरकारकडून सबसिडी मिळेल

तुम्ही 3 किलोवॅटपर्यंत सौर रुफटॉप पॅनेल बसवल्यास, सरकार तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल. त्याच वेळी, जर तुम्ही 10 किलोवॅटपर्यंत सौर पॅनेल लावले तर तुम्हाला 20 टक्के सबसिडी मिळेल.

    मुंबई, 6 जून : महागाईच्या (Inflation) काळाचा थोडीशी बचत देखील मोठा दिलासा देते. दरमहिन्याच्या घर खर्चात वीज बिलाचा (Electricity Bill) समावेश असतो. वीज दर जसे वाढत आहेत त्याप्रमाणे वीजबिलाचा खर्चही वाढत आहे. त्यात सध्या देशात विजेचे संकट पाहायला मिळत आहे. एकीकडे वीज प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा (Coal Shortage) जाणवत आहे, तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा कठीण काळात वीज संकटावर मात करण्यासाठी ग्रीन एनर्जी (Green Energy) फायदेशीर ठरु शकते. सोलर पॅनल हा वीज संकटासाठी चांगला पर्याय आहे.सोलार पॅनल बसवण्यासाठी सरकारची आर्थिक मदतही मिळते. सरकारडून सोलर पॅनलवर सबसिडी (Government Subsidy on Solar Panel) मिळते. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. जर तुम्हाला सोलर पॅनल बसवायचे असतील तर आधी तुम्हाला किती वीज लागते हे समजून घ्या. मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सोलर पॅनेल आहेत. यामध्ये पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागातून वीज निर्माण होते. अशी चार सोलर पॅनल एकत्र ठेवल्यास तुम्हाला दररोज 6-7 युनिटपर्यंत वीज सहज मिळेल. हे 4 सोलर पॅनल सुमारे 2 किलोवॅटचे असतील. सोन्या-चांदीचे दर या आठवड्यात वाढणार की कमी होणार? कोणते घटक ठरतील निर्णायक शासनाकडून अनुदान मिळते भारतात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी Ministry of New & Renewable Energy ने सोलर रूफ टॉप योजना सुरू केली आहे. डिस्कॉमच्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनेल लावू शकता आणि सबसिडीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये रुफटॉप सोलरची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारीही विक्रेत्याची असेल. 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी तुम्ही 3 किलोवॅटपर्यंत सौर रुफटॉप पॅनेल बसवल्यास, सरकार तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल. त्याच वेळी, जर तुम्ही 10 किलोवॅटपर्यंत सौर पॅनेल लावले तर तुम्हाला 20 टक्के सबसिडी मिळेल. स्थानिक वीज वितरण कंपनी (डिस्कॉम) ही योजना राज्यांमध्ये चालवत आहे. Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाची किंमत 120 डॉलर पार; पेट्रोल-डिझेल महागलं की स्वस्त झालं? किती खर्च येईल? जर तुम्हाला 2 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवायचे असेल तर त्याची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये असेल. मात्र यावर तुम्हाला सरकारकडून 40 टक्के सबसिडी मिळेल, त्यानंतर तुमचा खर्च 72,000 रुपयांपर्यंत खाली येईल आणि तुम्हाला सरकारकडून 48,000 रुपये सबसिडी मिळेल. सौर पॅनेलचे आयुष्य 25 वर्षे आहे. अशा परिस्थितीत, एकाच वेळी एवढी गुंतवणूक करून, तुम्ही महागड्या विजेपासून दीर्घकाळ सुटका मिळवू शकता आणि तुम्हाला एक प्रकारे मोफत वीज मिळेल. अर्ज करा सोलर रूफटॉप बसवण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://solarrooftop.gov.in/ वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला सोलर रूफटॉपसाठी अर्ज करावा लागेल. तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्ही राज्यानुसार लिंक निवडा. त्यानंतर फॉर्म उघडेल. यामध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती भरा. सौर पॅनेल बसवल्यानंतर 30 दिवसांच्या आत डिस्कॉमद्वारे प्रदान केलेल्या तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Electricity bill, Subsidy

    पुढील बातम्या